नाट्यदिग्दर्शक सुहास वरूणकर यांचे अल्प आजाराने निधन; रंगभूमीवर शोककळा

कणकवली:  रंगकर्मी, नाट्यदिग्दर्शक

सुहास वरूणकर 

 निधन;

रंगभूमीवर शोककळा

​कणकवली:

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील रहिवासी, राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील निवृत्त कर्मचारी, तसेच ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यदिग्दर्शक आणि अभिनेते सुहास वासुदेव वरूणकर (वय ६४) यांचे रविवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे.

​सांस्कृतिक क्षेत्रातील मोठी हानी

सुहास वरूणकर यांनी अक्षरसिंधू साहित्य कला मंचच्या माध्यमातून अनेक नाट्यकृतीमधून अभिनय केला, यशस्वी दिग्दर्शन केले आणि अनेक पुरस्कार प्राप्त केले. राज्य परिवहन महामंडळाच्या नाट्य स्पर्धेत त्यांनी सिंधुदुर्ग विभागाला अनेक पारितोषिके प्राप्त करून दिली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक होतकरू कलावंत घडवले, ज्यामुळे सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

​रुग्णालयात शहरवासीयांची गर्दी

रविवारी सायंकाळी त्यांना घरामध्येच अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच उपजिल्हा रुग्णालयात शहरवासीयांनी आणि कलाक्षेत्रातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

  • संबंधित पोस्ट

    पाणीटंचाईवर मात करण्यासाठी असरोंडी भाटीवाडीतील ग्रामस्थ एकवटले; वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण

    ​पाणीटंचाईवर मात असरोंडी भाटीवाडी वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण ​असरोंडी (प्रतिनिधी): भविष्यात भासणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि गावातील पाण्याचा साठा वाढवण्यासाठी मालवण तालुक्यातील असरोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ओहोळांवर ‘वनराई बंधारे’…

    पुढे वाचा

    भक्तिमय वातावरणात खासदार नारायण राणे,   यांच्या हस्ते आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत नवदुर्गेची महाआरती!

    ​ खासदार नारायण राणे,   यांच्या हस्ते नवदुर्गेची महाआरती! आमदार प्रमोद जठार  उपस्थितीत  ​कणकवली तालुका भाजपच्या नवरात्रोत्सवाला मान्यवरांची उपस्थिती; देवीचे दर्शन घेत केले सुख-समृद्धीसाठी साकडे ​कणकवली (कोकणराज लाईव्ह): शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    पाणीटंचाईवर मात करण्यासाठी असरोंडी भाटीवाडीतील ग्रामस्थ एकवटले; वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण
    भक्तिमय वातावरणात खासदार नारायण राणे,   यांच्या हस्ते आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत नवदुर्गेची महाआरती!
    कणकवलीत नवरात्रोत्सवाचा उत्साह: आमदार प्रमोद जठार यांनी सहकुटुंब घेतले कणकवली बाजारपेठेच्या आई भवानीचे दर्शन
    सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण
    कणकवलीत आज खासदार नारायण राणे आणि आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भव्य महाआरती!

    महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा

    महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा
    error: Content is protected !!