सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण

सिंधुदुर्ग जिल्हा बँके

वनराई बंधाऱ्यांसाठी

२५ हजार पिशव्यां

सिंधुदुर्ग :प्रतिनीधी

जिल्ह्यात ठिकठिकाणी जलसंधारणासाठी वनराई बंधाऱ्यांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून, या कामाला गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

वनराई बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या सुमारे २५ हजार पिशव्या बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडे सुपूर्त केल्या.

यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस,प्रकाश मोर्ये, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

वनराई बंधारा हा कमी खर्चात, लोकसहभागातून उभारला जाणारा जलसंधारणाचा प्रभावी उपाय आहे. नाला, ओढ्याच्या प्रवाहात वाळू भरलेल्या पिशव्या (गोणपाट) एकावर एक रचून पाणी अडवले जाते.
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूगर्भात जिरवले जाते आजूबाजूच्या विहिरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होते
शेतीसाठी पाणी उपलब्ध होते. मातीची धूप थांबते कोणतेही यंत्रसामुग्री न लागता श्रमदानातून काम पूर्ण होते

सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ भाग असल्याने पावसाचे पाणी वेगाने वाहून जाते. अशा परिस्थितीत वनराई बंधारे हे जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहेत. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात ५ते १० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यासाठी मोठ्या प्रमाणात पिशव्यांची गरज असते. जिल्हा बँकेने २५ हजार पिशव्या उपलब्ध करून दिल्याने हे काम अधिक वेगाने होणार आहे.

यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, “जिल्हा बँक ही फक्त आर्थिक संस्था नसून शेतकऱ्यांच्या हिताची संस्था आहे. पाणी हाच शेतकऱ्यांच्या समृद्धीचा पाया आहे. वनराई बंधाऱ्यासारख्या लोकचळवळीत बँकेला सहभागी होता येणे ही अभिमानाची गोष्ट आहे. यापुढेही जिल्ह्याच्या विकास कामात बँक सदैव अग्रेसर राहील.”

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी जिल्हा बँकेचे आभार मानत म्हटले की, “जिल्हा बँकेने दिलेल्या या मदतीमुळे जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामाला मोठे बळ मिळाले आहे. या पिशव्यांचे वाटप गरजेनुसार सर्व तालुक्यांमध्ये केले जाईल.”

जिल्हा बँकेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

  • संबंधित पोस्ट

    पाणीटंचाईवर मात करण्यासाठी असरोंडी भाटीवाडीतील ग्रामस्थ एकवटले; वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण

    ​पाणीटंचाईवर मात असरोंडी भाटीवाडी वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण ​असरोंडी (प्रतिनिधी): भविष्यात भासणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि गावातील पाण्याचा साठा वाढवण्यासाठी मालवण तालुक्यातील असरोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ओहोळांवर ‘वनराई बंधारे’…

    पुढे वाचा

    भक्तिमय वातावरणात खासदार नारायण राणे,   यांच्या हस्ते आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत नवदुर्गेची महाआरती!

    ​ खासदार नारायण राणे,   यांच्या हस्ते नवदुर्गेची महाआरती! आमदार प्रमोद जठार  उपस्थितीत  ​कणकवली तालुका भाजपच्या नवरात्रोत्सवाला मान्यवरांची उपस्थिती; देवीचे दर्शन घेत केले सुख-समृद्धीसाठी साकडे ​कणकवली (कोकणराज लाईव्ह): शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    पाणीटंचाईवर मात करण्यासाठी असरोंडी भाटीवाडीतील ग्रामस्थ एकवटले; वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण
    भक्तिमय वातावरणात खासदार नारायण राणे,   यांच्या हस्ते आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत नवदुर्गेची महाआरती!
    कणकवलीत नवरात्रोत्सवाचा उत्साह: आमदार प्रमोद जठार यांनी सहकुटुंब घेतले कणकवली बाजारपेठेच्या आई भवानीचे दर्शन
    सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण
    कणकवलीत आज खासदार नारायण राणे आणि आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भव्य महाआरती!

    महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा

    महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा
    error: Content is protected !!