मत्स्यव्यवसायाला
नवी दिशा देणारा
मंत्री नितेश राणे
आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि बंदर विकासाच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास; महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर
मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या आंध्र प्रदेशने आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, प्रभावी व्यवस्थापन प्रणाली आणि मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशस्वी विकास मॉडेलचा सखोल अभ्यास करून त्यातील आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी कार्यपद्धती महाराष्ट्रातही राबविण्याच्या उद्देशाने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री मा. श्री. नितेश राणे यांनी ७ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा केला. राज्यातील मत्स्यपालन, मत्स्योत्पादन, प्रक्रिया उद्योग आणि बंदर क्षेत्राला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. या निधीचा प्रभावी विनियोग करून राज्यातील मत्स्यपालन आणि मत्स्योत्पादन वाढविणे, मच्छीमारांचे उत्पन्न उंचावणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, या उद्देशाने या अभ्यास दौрыयाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिला दिवस : बंदर विकास, सागरी पायाभूत सुविधा आणि कौशल्यविकास
![]()
![]()
![]()
![]()
![]()
अभ्यास दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेश सचिवालयात राज्याचे पायाभूत सुविधा व गुंतवणूक तसेच रस्ते, इमारती आणि बंदरे विभागाचे मंत्री मा. श्री. बी. सी. जनार्दन रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील सागरी परिसंस्था अधिक सक्षम करणे, बंदर विकासाला चालना देणे आणि परस्पर सहकार्यातून विकासाच्या नव्या संधी निर्माण करणे यावर सविस्तर चर्चा झाली.
अदानी पोर्ट भेट (कृष्णापट्टणम): बंदरातील अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कार्गो हाताळणी व्यवस्था, खोल पाण्यातील जहाजांसाठी उपलब्ध सुविधा आणि आधुनिक कार्यपद्धतींची प्रत्यक्ष पाहणी.. . कौशल्यविकास व प्रशिक्षण: कार्गो हँडलिंग इक्विपमेंट ट्रेनिंग सिम्युलेटर तसेच ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी एक्सलन्स सेंटरची पाहणी. महाराष्ट्रासाठी लाभ: मरीन क्लस्टर, वाढवण बंदर आणि दिघी बंदर यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी महाराष्ट्रातही अशा प्रकारचे आधुनिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा.
दूसरा दिवस : आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, खाद्यनिर्मिती आणि मूल्यवर्धन
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विजयवाडा येथील मत्स्य आयुक्तालयाच्या मुख्यालयाला भेट देऊन वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्यात आला.
IoT-सक्षम मत्स्यपालन (AquaExchange): तलाव आणि पाण्याच्या गुणवत्तेचे रिअल-टाइम निरीक्षण, स्वयंचलित खाद्य व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित फार्म इंटेलिजन्स आणि रोगनिदानाची आधुनिक प्रणाली अभ्यासली. खाद्यनिर्मिती प्रकल्प (Deepak Nexgen, बोम्मुलुरू): मत्स्य व कोळंबीपालनासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्याची निर्मिती प्रक्रिया, पोषण व्यवस्थापन आणि उत्पादनक्षमता वाढविणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती.मूल्यवर्धित उत्पादने (APQA Private Limited, नरसिंहपुरम): मत्स्य व कोळंबी प्रक्रिया करताना उरलेल्या टाकाऊ पदार्थांपासून औषधे, सौंदर्यप्रसाधने, साबण, कॅल्शियम, प्रोटीन आणि चिटिन यांसारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याच्या पद्धतींची पाहणी.
तिसरा दिवस : प्रक्रिया उद्योग, निर्यात आणि वैज्ञानिक संशोधनाचा अभ्यास
तिसऱ्या दिवशी आंध्र प्रदेशातील रायालम आणि भीमावरम परिसरातील प्रकल्पांना भेटी देण्यात आल्या.
प्रक्रिया उद्योग (जगदीश मरीन एक्सपोर्ट व मौर्य एक्वाक्स): काढणीनंतरचे व्यवस्थापन, आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान आणि निर्यातक्षम उत्पादन तयार करण्याच्या पद्धतींचा सविस्तर अभ्यास.
वैज्ञानिक संशोधन (Ananda Advanced Aqua Lab): मत्स्यपालनातील रोगनिदान, पाणी व मातीच्या गुणवत्तेचे परीक्षण आणि वैज्ञानिक चाचण्यांच्या प्रक्रियेची माहिती. यामुळे संभाव्य नुकसान टाळून उत्पादकता कशी वाढवता येते, याचा आढावा घेण्यात आला.
महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
आंध्र प्रदेशच्या यशस्वी मत्स्यव्यवसाय मॉडेलचा महाराष्ट्राच्या गरजेनुसार अवलंब केल्यास राज्यातील मत्स्यव्यावसायिकांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग, बंदर क्षेत्रातील कौशल्यविकास आणि निर्यातक्षम उत्पादनांना प्रोत्साहन मिळाल्यामुळे महाराष्ट्रात रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेला मोठी चालना मिळणार आहे.
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री मा. श्री. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला मत्स्यव्यवसाय व सागरी विकास क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य बनविण्याच्या दिशेने हा अभ्यास दौरा एक मैलाचा दगड ठरणार आहे.








