खासदार नारायण राणे, यांच्या हस्ते

नवदुर्गेची महाआरती!
आमदार प्रमोद जठार उपस्थितीत
कणकवली तालुका भाजपच्या नवरात्रोत्सवाला मान्यवरांची उपस्थिती; देवीचे दर्शन घेत केले सुख-समृद्धीसाठी साकडे
कणकवली (कोकणराज लाईव्ह):
शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात भक्ती, श्रद्धा आणि शक्तीचा जागर सुरू असतानाच, कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व खासदार नारायणराव राणे आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी नवदुर्गा देवीचे भावपूर्ण दर्शन घेतले. तसेच देवीच्या महाआरतीमध्ये सहभागी होत आदिशक्ती दुर्गामातेच्या चरणी नतमस्तक झाले.
नवरात्रोत्सवाच्य निमित्ताने ‘अंबे मात की जय’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. पारंपरिक धार्मिक वातावरणात पार पडलेल्या महाआरतीवेळी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देवीचे दर्शन घेतले. आदिशक्तीच्या कृपेने संपूर्ण महाराष्ट्राला व कोकणाला सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या मंगलमय धार्मिक सोहळ्याला निलमताई राणे, गिरिजाताई जठार यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. यात प्रामुख्याने:
प्रमोद सावंत (अध्यक्ष, जिल्हा परिषद)
संदेश तथा गोट्या सावंत (सदस्य, जिल्हा परिषद)
सोनू सावंत (उपसभापती, कणकवली पंचायत समिती)
प्रदीप गावडे, (पंचायत समिती सदस्य)
बबलू सावंत (सदस्य, पंचायत समिती)
संदीप मेस्त्री (सरपंच, कलमठ)
सर्वेश दळवी (उपसरपंच, हरकुळ)
डॉ. मिलिंद कुलकर्णी, समीर प्रभू गावकर,संतोष चव्हाण, अण्णा कोदे, स्वप्नील चिंदरकर, पप्या पुजारी, परेश कांबळी, महेश गुरव, प्रसाद देसाई,
यांच्यासह भाजपचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ-देवीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी खासदार नारायणराव राणे आणि आमदार प्रमोद जठार यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन येतोच सत्कार केला

भक्ती अन् सांस्कृतिक परंपरेचा संगम!
कणकवली तालुका भाजपच्या वतीने आयोजित या नवरात्रोत्सवातून भक्तीभाव, आस्था आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे अप्रतिम दर्शन घडले. महाआरतीच्या मंगलमय वातावरणात उपस्थितांनी नवदुर्गेचा जयघोष करत उत्सवाचा आनंद द्विगुणीत केला.







