राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर; पक्षाच्या आगामी वाटचालीवर आणि संघटनात्मक विस्तारावर महत्त्वपूर्ण चर्चा!

​राष्ट्रवादी काँग्रेस

ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर

सिंधुदुर्ग दौरा.   

पक्षाच्या आगामी वाटचालीवर आणि संघटनात्मक विस्तारावर महत्त्वपूर्ण चर्चा!


​सिंधुदुर्ग:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक तथा ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत संघटनात्मक बांधणीवर आणि आगामी राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा केली. 


​दौऱ्याची सुरुवात करताना राज राजापूरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची प्रथम सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी अनंत पिळणकर यांनी राज राजापूरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन उत्साहात सत्कार केला. या भेटीदरम्यान कणकवली तालुक्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
​कणकवली दौऱ्यानंतर राजापूरकर यांनी देवगड येथे जाऊन राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदूशेठ घाटे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केल्यानंतर, देवगड भागातही पक्षाचा विस्तार व आगामी उपक्रमांवर त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.
​या दौऱ्यात आणि बैठकांमध्ये कोकण विभागीय अध्यक्ष (सोशल मीडिया फ्रंट) प्रा. सचिन पाटकर, सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, देवगड तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, राष्ट्रवादीचे नेते शरद शिंदे, युवक जिल्हा उपाध्यक्ष नवीन गावडे, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, तालुका उपाध्यक्ष महेश चव्हाण, तसेच उत्तम तेली यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​या दौऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, आगामी काळात पक्ष अधिक जोमाने लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

  • संबंधित पोस्ट

    शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची विधिवत प्रतिष्ठापना; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण मिरवणूक!

    कणकवली  शिवसेनेच्या  दुर्गामाता प्रतिष्ठापना; जल्लोषपूर्ण मिरवणूक! ​कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात करण्यात आली.…

    पुढे वाचा

    सिंधुदुर्गच्या आराध्य गोडवेची सुवर्णझळाळी कायम! राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत पटकावले कास्य पदक

    ​सिंधुदुर्ग आराध्य गोडवे सुवर्णझळाळी  राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत  कास्य पदक ​कणकवली : राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत ‘तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग’च्या आराध्य गोडवे या प्रतिभावान खेळाडूने…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची विधिवत प्रतिष्ठापना; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण मिरवणूक!

    सिंधुदुर्गच्या आराध्य गोडवेची सुवर्णझळाळी कायम! राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत पटकावले कास्य पदक

    सिंधुदुर्गच्या आराध्य गोडवेची सुवर्णझळाळी कायम! राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत पटकावले कास्य पदक

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर; पक्षाच्या आगामी वाटचालीवर आणि संघटनात्मक विस्तारावर महत्त्वपूर्ण चर्चा!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर; पक्षाच्या आगामी वाटचालीवर आणि संघटनात्मक विस्तारावर महत्त्वपूर्ण चर्चा!
    नाट्यदिग्दर्शक सुहास वरूणकर यांचे अल्प आजाराने निधन; रंगभूमीवर शोककळा

    कणकवलीत बाजारपेठ मित्रमंडळाच्या ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांचा उत्साह! दुर्गामाता आगमन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

    कणकवलीत बाजारपेठ मित्रमंडळाच्या ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांचा उत्साह!  दुर्गामाता आगमन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
    जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या दालनात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सहविचार सभा संपन्न
    error: Content is protected !!