सावंत फौंडेशन आणि गोवा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित”विज्ञान सहल” प्रेरणादायी

कणकवली प्रतिनिधी

सावंत फौंडेशन संचलित डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र ,कळसुली आणि गोवा विज्ञान केंद्र,मिरामार संयुक्तरित्या आयोजित कार्यक्रम “विज्ञान सहल” सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, आणि वैभववाडी तालुक्यातील एकूण 15 शाळांन 21 नोव्हेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 असा महिना भर 2024 ते 2025 शैक्षणिक वर्षातील शेवटच्या महत्वाच्या टप्प्यावर एकत्रित संयुक्तपणे आयोजित कार्यक्रम

 शाळांमध्ये विज्ञान सहल प्रात्यक्षिक, आकाश दर्शन व विज्ञान विषयावर फिल्म व चर्चा आयोजित करण्यात आले होते आता ही सहल शेवटच्या पर्वात अचीर्णे गावात शाळेत आपला शेवटचा कार्यक्रम दिनांक 19 व 20 डिसेंबर ला होणार आहे

गोवा विज्ञान केंद्र, मिरामार हे राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, सरकारचे एक घटक आहे. भारताचे. सामान्य लोकांमध्ये विज्ञान लोकप्रिय करणे आणि तरुण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणे हा केंद्राचा तसेच डॉ रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्राचा मुख्य उद्देश आहे.

विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी संवादात्मक प्रदर्शने आणि इतर शिक्षण विस्तार कार्यक्रमांद्वारे विज्ञान शोधण्यासाठी एक परिपूर्ण वातावरण प्रदान करते. केंद्राकडे फिरते विज्ञान प्रदर्शन युनिट देखील आहे, जे दुर्गम भागातील शाळांच्या गरजा पूर्ण करते. युनिटमध्ये “मानवी शरीरशास्त्र आणि सामान्य विज्ञान” नावाचे नवीन प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन एका बसमध्ये बसवण्यात आले असून पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार प्रत्येक ठिकाणी दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली हे गेली वीस वर्षे सिंधुदुर्गामधील विविध शाळांमध्ये विज्ञान विषयक कार्यशाळा व शैक्षणिक उपक्रम आयोजित करत आहेत.


विज्ञान विषयावर अनेक शैक्षणिक कार्यक्रम आहेत जसे की सायन्स फिल्म शो, सायन्स प्रात्यक्षिक व्याख्याने आणि आकाश निरीक्षण सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमा साठी काही शाळांनी अगोदरच आपली नावं नोंदणी केली होती. याची अम्मल बजावणी या दिवसात केली गेली
सावंत फौंडेशन व गोवा विज्ञान केंद्र यांची चार जणांची टीम उत्कृष्ट पणे आपलं काम पार पाडत आहे
गोवा सायन्स सेंटर टीम
उगम पाडलोस्कर-

एजुकेशन ट्रेनर  विनय गौरकर- तंत्रज्ञ

सुनील परब- चालक

सावंत फौंडेशन संचलित डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र
रामचंद्र राणे सावंत फौंडेशन सहाय्यक प्रतिनिधी यांनी नियुक्ती करण्यात आली होती. त्यासाठी संपर्क क्रमांक 8275187062 हा नंबर अधिक माहिती साठी संपर्क करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता या याव्यतिरिक्त sawantfoundationorg@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधण्यासाठी आव्हान करण्यात आले होते
लवकरच उर्वरित तालुक्यातही हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे . आपलं सहकार्य आम्हाला असेच लाभू द्या व विद्यार्थ्यांना हा ज्ञानाचा पुरेपूर आस्वाद घेऊध्या आणि संस्थेच्या ब्रीडवाक्याला साजेसे काम करून अधिका अधिक विद्यार्थ्यांची प्रगतीत भर पडेल आणि विज्ञान विषयात विद्यार्थ्यांचा वाढेल हे निश्चित आहे

 

संबंधित पोस्ट

कणकवली बाजारपेठेच्या श्री भवानी मातेचे अतुल रावराणे यांनी घेतल दर्शन; आमदार प्रमोद जठार व नगराध्यक्ष संदेश पारकर यांची विशेष उपस्थिती!

कणकवली बाजारपेठ श्री भवानी माता  अतुल रावराणे पूजा/ दर्शन; आमदार प्रमोद जठार  नगराध्यक्ष संदेश पारकर  उपस्थिती! ​कणकवली | १४ ऑक्टोबर २०२६: कणकवली शहरात नवरात्रोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला असून, बाजारपेठेतील…

पुढे वाचा

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी असरोंडी भाटीवाडीतील ग्रामस्थ एकवटले; वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण

​पाणीटंचाईवर मात असरोंडी भाटीवाडी वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण ​असरोंडी (प्रतिनिधी): भविष्यात भासणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि गावातील पाण्याचा साठा वाढवण्यासाठी मालवण तालुक्यातील असरोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ओहोळांवर ‘वनराई बंधारे’…

पुढे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे विसरू नका

कणकवली बाजारपेठेच्या श्री भवानी मातेचे अतुल रावराणे यांनी घेतल दर्शन; आमदार प्रमोद जठार व नगराध्यक्ष संदेश पारकर यांची विशेष उपस्थिती!

कणकवली बाजारपेठेच्या श्री भवानी मातेचे अतुल रावराणे यांनी घेतल दर्शन; आमदार प्रमोद जठार व नगराध्यक्ष संदेश पारकर यांची विशेष उपस्थिती!
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी असरोंडी भाटीवाडीतील ग्रामस्थ एकवटले; वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण
भक्तिमय वातावरणात खासदार नारायण राणे,   यांच्या हस्ते आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत नवदुर्गेची महाआरती!
कणकवलीत नवरात्रोत्सवाचा उत्साह: आमदार प्रमोद जठार यांनी सहकुटुंब घेतले कणकवली बाजारपेठेच्या आई भवानीचे दर्शन
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण
कणकवलीत आज खासदार नारायण राणे आणि आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भव्य महाआरती!
error: Content is protected !!