नितेश राणेंचा २२ डिसेंबरला सिंधुदुर्गात महायुतीच्या वतीने स्वागत आणि कणकवलीत भाजपच्या वतीने नागरी सत्कार

 कणकवलीत भाजपच्या वतीने नितेश राणेंचा नागरी सत्कार. २२ डिसेंबरला सिंधुदुर्गात महायुतीच्या वतीने होणार स्वागत!

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँक अध्यक्ष यांची माहिती  

कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यानंतर ते रविवार २२ डिसेंबर रोजी जिल्ह्यात मंत्री म्हणून प्रथमच दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी परिवार, महायुतीचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्ह्यातील नागरिक यांच्यावतीने जिल्ह्यात त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्याचे नियोजन भारतीय जनता पार्टी कडून करण्यात आलेले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली
प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, सर्व जिल्हा पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्ष यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक संपन्न झाली. या नियोजनाच्या बैठकीमध्ये स्वागताचे पूर्ण नियोजन आणि त्यांचा पहिला जिल्हा दौरा कसा असेल याचे नियोजन करण्यात आलेलं आहे.
आजपर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना राज्यात मंत्रीपद मिळालेलं नव्हतं. ते भाजपा कार्यकर्त्यांचे स्वप्न नितेश राणे यांच्या रूपाने पूर्णत्वास आले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड असा उत्साह आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत त्याच पद्धतीचं झालं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे.
२२ डिसेंबरला सकाळी मंत्री नितेश राणे यांचं हे ९.३० वा.खारेपाटण येथे दाखल झाल्यावर त्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत होईल. तिथे उपस्थित मंडळी आणि त्या विभागातील त्या परिसरातले सर्वजण त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर १०.१५ वाजता तळेरे येथे येऊन पंधरा मिनिटे तरळ्यामध्ये थांबतील. तिथे स्वागत स्वीकारतील. त्यानंतर फणसगांव करून ११.१५ वाजता पडेलला पोहोचतील. तिथे त्यांचे स्वागत झाल्यानंतर १२ वा. वाजता मंत्री राणे देवगडला येतील. तिथे त्यांचे जंगी स्वागत होईल. १२.४५ वा तळेबाजारला स्वागत होईल. दुपारी १.१५ ‍ वाजता शिरगावला स्वागत होईल. दुपारी १.४५ मिनिटांनी नांदगाव करून दु २.३० वा भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्गनगरी येथील वसंतस्मृती येथील जिल्हा कार्यालयामध्ये दाखल होतील. तत्पूर्वी जिल्हा मुख्यालय ओरोस फाटा येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पूष्पहार अर्पण करतील. भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयाच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होईल. त्यानंतर ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये ते भेट देतील. जिल्हा बँकेचे ते विद्यमान संचालकही आहेत आणि जिल्हा बँकेच्या दृष्टीने सुद्धा आपल्यातील एक संचालक राज्याचा कॅबिनेट मंत्री झाल्यार्चा आनंद आहे. जिल्हा बँकेमध्ये त्यांचे स्वागत झाल्यानंतर ते बांदयाकडे रवाना होतील. ४ वाजता बांदा नंतर ४.४५ वाजता दोडामार्ग येथे भव्य दिव्य असं स्वागत होईल आणि मंत्री राणे कणकवलीकडे रवाना होतील.
सायंकाळी ७ ते ९ दरम्यान कणकवलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्री राणे यांचा नागरी सत्कार संपन्न होईल. भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या समोरच्या पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सगळ्यांच्या भेटीगाठी होतील आणि नंतर ते काही इतर कार्यक्रमाना उपस्थित राहतील, असेही त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सांगितले.
सगळेजण मंत्री नितेश राणे व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी मंडळी आहेत. या सगळ्यांनी या वेळेप्रमाणे आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे आणि संध्याकाळी सात वाजता जो नागरी सत्कार कणकवलीत आयोजित केलेला आहे त्याला सुद्धा मोठ्या संख्येने सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला नितेश राणे यांच्या रूपाने भाजपला मंत्रीपदाचा बहुमान मिळालेला आहे. याआधी जिल्ह्यातील अनेक सुपुत्रांना मंत्रिपदाचा बहुमान मिळाला. यापूर्वी विनोद तावडे, आशिष शेलार, माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण ही मंडळी मुंबईचे आमदार म्हणून कार्यरत होते. इतिहासात पहिल्यांदाच या जिल्ह्यातून निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. यामुळे खूप मोठ्या उत्साहात त्याचा सत्कार होईल.

२२ रोजीच्या दौऱ्यात संपूर्ण जिल्ह्यातील भेटी अशक्य असल्याने पुन्हा २५ डिसेंबरला उर्वरित तालुक्यामध्ये जाऊन ते भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांकडून नागरी सत्कार स्वीकारतील, असेही यावेळी सांगण्यात आले

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्गचे सुपुत्र समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त!

     समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त! ​छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कार्यकारिणी बैठकीत महत्त्वपूर्ण निवड; कोकणासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव ​कणकवली / ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा साहित्य परिषद,…

    पुढे वाचा

    कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव कार्यक्रम उत्साहात संपन्न; रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद!

    कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव  रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद! ​कणकवली / प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हळवल येथे ‘आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल’ निर्मित आणि प्रस्तुत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ हा अनोखा अभिवाचन…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्गचे सुपुत्र समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त!
    कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव कार्यक्रम उत्साहात संपन्न; रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद!

    शिरवंडे शाळेच्या ‘श्री गणेश चतुर्थी भेटकार्ड’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; इयत्ता आठवीच्या दुर्वा लुडबे हिने गोळा केली तब्बल १०,६५७ रुपयांची देणगी!

    शिरवंडे शाळेच्या ‘श्री गणेश चतुर्थी भेटकार्ड’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; इयत्ता आठवीच्या दुर्वा लुडबे हिने गोळा केली तब्बल १०,६५७ रुपयांची देणगी!

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    error: Content is protected !!