शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची विधिवत प्रतिष्ठापना; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण मिरवणूक!

कणकवली 

शिवसेनेच्या 

दुर्गामाता

प्रतिष्ठापना;

जल्लोषपूर्ण

मिरवणूक!

​कणकवली (प्रतिनिधी):

कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात करण्यात आली. कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते दुर्गामातेचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले.

​ढोल-ताशांचा निनाद आणि आतषबाजीने परिसर दुमदुमला

​देवीच्या आगमनानिमित्त कणकवली पटवर्धन चौकातून नरडवे फाट्यानजीक असलेल्या शिवसेनेच्या नवरात्रोत्सव स्थळापर्यंत भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘दुर्गामातेचा विजय असो’ या जयघोषाने संपूर्ण मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला होता. शिवसैनिकांच्या जल्लोषाने वातावरणात मोठा उत्साह निर्माण झाला.

​आकर्षक रोषणाई आणि भव्य दरबार

​नवरात्रोत्सवासाठी दुर्गामातेचा दरबार अत्यंत सुबक व आकर्षक सजावटीने सजवण्यात आला आहे. संपूर्ण उत्सवस्थळी भव्य आणि नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे देवीचा दरबार अधिकच आकर्षित व प्रसन्न दिसत आहे.

​प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

​या मिरवणुकीत व पूजन सोहळ्यात माजी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, नगरसेवक जयेश धुमाळे, नगरसेवक संकेत नाईक यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

​२१ ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

​बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात दररोज श्री दुर्गामातेची नित्यपूजा, आरती व धार्मिक विधी पार पडणार आहेत. याशिवाय भाविकांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

​या सोहळ्यास तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, राजू राठोड, विलास गुडेकर, सतीश नाईक, राजू शेटये, अनिल हळदीवे, राजू राणे, मंदार ओरसकर, बबली राणे, महेश कोदे, उत्तम लोके, हर्षद गावडे, नंदिनी नाईक, माधवी दळवी, संजना कोलते, दिव्या साळगावकर, प्रतीक्षा साटम, साक्षी आमडोसकर, रोहिणी पिळणकर, अर्पिता परब, रचना खांदारे, शोभा बागवे, अजित काणेकर, तेजस राणे, महादेव राठवड, रोहित राणे, रुपेश आमडोसकर, जगन्नाथ आजगावकर, रमाकांत राणे, विठोबा मर्ये, अक्षय कदम, सुरेश मोरे, वैभव सावंत, रवींद्र खांदारे, रमेश गावकर, संदीप वारंग, ओमप्रकाश ताम्हाणेकर, आनंद महाडेश्वर, स्वप्निल पाटील, पराग म्हापसेकर, ओंकार चव्हाण, अरुण परब यांच्यासह तालुक्यातील अनेक शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

  • संबंधित पोस्ट

    महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा

     मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे  ​आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि बंदर विकासाच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास; महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर ​मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या…

    पुढे वाचा

    सिंधुदुर्गच्या आराध्य गोडवेची सुवर्णझळाळी कायम! राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत पटकावले कास्य पदक

    ​सिंधुदुर्ग आराध्य गोडवे सुवर्णझळाळी  राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत  कास्य पदक ​कणकवली : राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत ‘तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग’च्या आराध्य गोडवे या प्रतिभावान खेळाडूने…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा

    महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा
    शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची विधिवत प्रतिष्ठापना; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण मिरवणूक!

    सिंधुदुर्गच्या आराध्य गोडवेची सुवर्णझळाळी कायम! राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत पटकावले कास्य पदक

    सिंधुदुर्गच्या आराध्य गोडवेची सुवर्णझळाळी कायम! राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत पटकावले कास्य पदक

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर; पक्षाच्या आगामी वाटचालीवर आणि संघटनात्मक विस्तारावर महत्त्वपूर्ण चर्चा!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर; पक्षाच्या आगामी वाटचालीवर आणि संघटनात्मक विस्तारावर महत्त्वपूर्ण चर्चा!
    नाट्यदिग्दर्शक सुहास वरूणकर यांचे अल्प आजाराने निधन; रंगभूमीवर शोककळा

    कणकवलीत बाजारपेठ मित्रमंडळाच्या ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांचा उत्साह! दुर्गामाता आगमन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

    कणकवलीत बाजारपेठ मित्रमंडळाच्या ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांचा उत्साह!  दुर्गामाता आगमन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
    error: Content is protected !!