कनेडी हायस्कूलची श्रेया महाडिक राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

कनेडी हायस्कू कनेडी लच्या श्रेया महाडीकची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड ती राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कनेडी हायस्कूलचा कॅरम मधील दबदबा कायम.

क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व क्रीडा परिषद यांच्या वतीने दिनांक १३ ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय कॅरम आंबोली सैनिक स्कूल ता. सावंतवाडी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थिनी कु. श्रेया राजेंद्र महाडीक (इ. १०वी ) हिने उत्कृष्ट कॅरम खेळाचे प्रदर्शन करत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात पाचवा क्रमांक प्राप्त करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली. तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये ती आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. गतवर्षी सुद्धा याच प्रशालेच्या कु. दिक्षा चव्हाण हिने राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले होते.
क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबईचे विद्यमान संचालक सन्मा. श्री. सतीश सावंत व सर्व सन्माननीय पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी श्रेयाचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कु‌. श्रेया हिला प्रशालेतील संस्कृत तथा इंग्रजी अध्यापक आणि कॅरम प्रशिक्षक श्री. मकरंद आपटे, क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण, जिल्ह्यातील ख्यातनाम कॅरम खेळाडू श्री. गौतम यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

पुढे वाचा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

पुढे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे विसरू नका

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

error: Content is protected !!