मुस्लिम समाज माझ्या पाठीशी_बंदेनवाज खाणी

कणकवली प्रतिनिधी

.

                      भाजपाचा १०५ आमदारांमध्ये एकच आमदार मुस्लिम समाजावर टीका का करतात ? आमच्या समाजाच्या जीवावर दहा वर्षे आमदारकी भोगली !_    बंदेनवाज खाणी

आमदारांच्या भुलथापाना मुस्लीम समाजाने बळी पडू नये-
आमच्या मुस्लिम समाजाच्या जीवावर दहा वर्षे आमदारकी भोगली आहे. राणेंनी निवडून येण्यापूर्वी आमच्या समाजाकडे येऊन मते मागताना, मी तुमच्या समाजाच्या पाठीशी आहे. मला मतदान करा असे सांगून मागील दोन निवडणुकांमध्ये मते घेतली. मात्र ,गेल्या १० वर्षात आमच्या मुस्लिम समाजांच्या वाड्याना विकासापासून दूर ठेवण्याचं काम या नितेश राणेंनी केले आहे.भाजपाचा १०५ आमदारांमध्ये एकच आमदार मुस्लिम समाजावर टीका का करतात? त्यांना भाजपने कॉन्ट्रॅक्ट दिले आहे का? त्यामुळे आमदार राणे यांच्या भुलथापाना मुस्लिम समाजाने बळी पडू नये,असे आवाहन कणकवलीचे अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी केलं आहे.
कणकवली येथील जलतरंग हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आरिफ काझी ,आरिफ शेख,नासीर शेख, सोहेल चौगुले,आदिल चौगुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमच्या मुस्लिम समाजाच्या जीवावर गेली दहा वर्ष आमदारकीची नितेश राणे यांनी भोगली आहे. आमच्या समाजाला दोन्ही निवडणुकांमध्ये दिलेली आश्वासने नितेश राणे यांनी पाळलेली नाहीत. समाजाला दुर्लक्षित ठेवण्याचं काम आमदारानी केल आहे.आमच्या समाजाची फसवणूक करत विश्वासघात त्यांनी केलेला आहे.
नितेश राणे एकदा काँग्रेसमधून तर दुसऱ्यांदा भाजपातुन निवडणुक लढले.आमच्या मुस्लीम बांधवांनी त्यांना साथ दिली. मत मागताना  राणे सांगत होते, तुमच्या पाठीशी रहाणार,. मात्र १० वर्षे आमदारकी भोगल्यानंतर आपले रंग दाखवयला सुरुवात केली. सातत्याने मंत्री पद मिळेल म्हणुन मुस्लीम समाजावर टिका करुन धमकी देण्याचा प्रयत्न करीत आहेत.  राणेंनी सर्वसमभाव सोडलेला आहे. ते जातीवाचक बोलुन आमच्या समाजाला बाजुला करण्याचे काम करत आहेत. आता या निवडणुकीत माझा मुस्लीम समाज माझ्या पाठीशी आहे.  काही लोक शरीराने त्यांच्यासोबत आहेत, मात्र मला फोन करुन आमचे बांधव आम्ही तुमच्यासोबत आहे, असे सांगत आहेत. त्यामुळे आ.नितेश राणे यांचा पराभव निश्चीत असल्याचे मत अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी व्यक्त केले.
भाजपाचे मोदी व शाहा यांचे धोरण .सबका साथ सबका विकास आहे.. मग राणे जातीवाचक का वागतात? मुस्लीम समाजावर भडकावु का बोलतात? आमच्या समाजाच्या मुशीदीत मुस्लीम बांधवांना मारण्याची धमकी का देतात? असल्या आमदाराच्या जनतेने पाठीशी राहु नये. त्यांनी पहिल्यांदा दिल्लीत जावुन ..सबका साथ सबका विकास..यावर धोरण निश्चीत करावे. नंतर आमच्या लोकांशी चर्चा करावी. मंत्रीपद मिळविण्यासाठी ही काही महिन्यांपासुन बडबड सुरु आहे. त्यामुळे आम्हाला जाती वाद नको,आपण एकात्मता घेवून विकास केला पाहिजे. आमच्या समाजाने अशा आमदाराला परत संधी देवू नका. समाजाची भावना घेवुन लढाईत उतरलो आहे. हा लढा मी जिंकुन दाखवेन असा विश्वास बंदेनवाज खानी यांनी व्यक्त केला.
काल कणकवली बस स्थानकात दुर्दैवी अपघात होवुन फातिमा हीचा मृत्यू झाला आहे.त्यात दोषी चालक, वाहक, संबंधित अधिकारी याचे निलंबन करण्याची मागणी मी केली आहे. संबंधित कुटुंबियांचे सांत्वन करुन आधार देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचे भेट घेणार आहे. संदेश पारकर यांच्या कर्जासंदर्भात २३ तारीखला अधिकृत भुमिका जाहीर करणार असल्याचे श्री. खानी यांनी सांगितले

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!