कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; जनसेवेच्या व्रताचा पुनरुच्चार

​कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर 

जनता आणि कार्यकर्त्यांच प्रेम हीच ऊर्जा

जनसेवेच्या व्रताचा “पुनरुच्चार”

​कणकवली:

कणकवलीचे लोकप्रिय नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी, स्नेहीजनांनी आणि संदेशप्रेमींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. या निमित्ताने कणकवलीत जनसागर उसळला होता.
​सकाळपासूनच पारकर यांच्या कणकवली बाजारपेठ येथील निवासस्थानी आणि नगरपंचायत कणकवली ,त्यानंतर कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल (HPCL) सभागृहात शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांची मोठी गर्दी उसळली होती. सकाळी याच सभागृहात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

​जनसेवेचे व्रत माझे ध्येय

​कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संदेश पारकर म्हणाले, “जनता आणि कार्यकर्त्यांचे अफाट प्रेम हीच माझ्या कामाची खरी ताकद आहे. जनतेच्या आग्रहामुळे आणि विश्वासामुळेच मी पुन्हा एकदा कणकवलीच्या नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे. मी आमदार किंवा खासदार व्हावे, अशी कार्यकर्त्यांची आणि जनतेची इच्छा असली, तरी माझ्यासाठी जनसेवा महत्त्वाची आहे. हे समाजसेवेचे व्रत मी अविरतपणे चालू ठेवीन”.
​एचपीसीएल सभागृहात आयोजित कार्यक्रमात पारकर यांनी वाढदिवसानिमित्त केक कापला. यावेळी उपस्थित जनसमुदायाने ‘पारकर साहेब तुम आगे बढो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

​मान्यवरांची उपस्थिती

​या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये माजी आमदार विजय सावंत, प्रा. दिवाकर मुरकर, निवृत्त शिक्षक डी. पी. तानावडे, उबाठा शिवसेना महिला आघाडीप्रमुख सौ. नीलम सावंत-पालव, कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, दीपिका जाधव, जाई मुरकर, सुमेधा अंधारी, लुकेश कांबळे, माजी नगरसेवक उमेश वाळके, विलास कोरगांवकर, भाई परब, कसाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालणकर, शीतल मांजरेकर आणि राजन पारकर यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!