विकासाला गती
कणकवलीच होणार ‘स्मार्ट’,
विविध विकासकामांचा शुभारंभ

कणकवली:

कणकवली नगर पंचायतीच्या वतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. मुख्य आप्पासाहेब पटवर्धन चौकातील सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजनाने या विकास पर्वाचा नारळ वाढवण्यात आला.
उड्डाणपुलाखालील जागा होणार आकर्षणाचे केंद्र
शहरातील उड्डाणपुलाखालील जागेचा कायापालट करण्याचा मानस नगराध्यक्षांनी व्यक्त केला. ४४ पिलर्सच्या परिसराचा विकास करण्यासाठी ४० ते ५० कोटींचा ‘डीपीआर’ (DPR) तयार करण्यात आला आहे. यामध्ये ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, तरुणांसाठी क्रीडा सुविधा, योग केंद्र आणि परमपूज्य मालचंद्र महाराज यांचा देखावा उभारला जाणार आहे.
पायाभूत सुविधांवर भर
प्रसाधनगृहे: शहरात तीन नवीन प्रसाधनगृहे उभारली जाणार असून, बसस्थानकासमोरील कामासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
पाणी व स्वच्छता: जुन्या नळपाणी योजनेच्या नूतनीकरणासाठी आणि नवीन भुयारी गटार योजनेसाठी ५० ते ७० कोटींची योजना प्रस्तावित आहे.व्यावसायिकांचे पुनर्वसन: सुशोभीकरणाच्या कामात बाधित झालेल्या व्यावसायिकांना वाऱ्यावर न सोडता, जुने भाजीमार्केट विकसित करून तिथे पुनर्वसन केले जाणार आहे.
राजकाप्रसाधनगृहे: शहरात तीन नवीन प्रसाधनगृहे उभारली जाणार असून, बसस्थानकासमोरील कामासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत.आता राजकारण संपले, आता फक्त विकास: संदेश पारकर
यावेळी बोलताना संदेश पारकर म्हणाले, “निवडणूक आता मागे पडली आहे. कणकवलीचा शाश्वत विकास करण्याचे आमचे ध्येय असून, यासाठी सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन आम्ही एक ‘कणकवली पॅटर्न’ विकसित करू.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांचे या कामांसाठी मोलाचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी प्रशासकीय स्तरावरून सर्व कामे गुणवत्तेसह आणि वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश पवार यांनी केले.








