नगराध्यक्ष संदेश पारकर भालचंद्र आशीर्वाद
कणकवली | १४ जुलै
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथील परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या मठात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराजांच्या चरणी लीन होत आशीर्वाद घेतले आणि आपल्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी प्रार्थना केली.
याप्रसंगी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासोबत अवधूत मालवणकर, रामदास मांजरेकर, फ्रँकी लोगो यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांच्या पुढील कार्यास भरघोस यश मिळो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आपल्या वाढदिवसाची सुरुवात धार्मिक कार्याद्वारे आणि संतांच्या आशीर्वादाने केल्याबद्दल संदेश पारकर यांचे स्थानिक पातळीवर कौतुक होत आहे.








