विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला तर सरस्वती आणि चांगले ज्ञान मिळेल :बाळकृष्ण लळीत

  कणकवली प्रतिनिधी

चांगला अभ्यास केला तर सरस्वती आणि चांगले ज्ञान मिळेल :बाळकृष्ण लळीत

वामनराव महाडिक हे ज्ञानसाधक होते.मुळातच ते शिक्षक होते.आणि राजकारणापेक्षा त्यांनी समाजकारण केले,त्यामुळेच त्यांनी इथल्या ग्रामीण भागातील मुलांचा विचार करून ही शिक्षणाची चळवळ उभी केली, असे सांगतानाच वामनराव महाडिक यांच्याविषयी अनेक प्रसंग कथन केले.तर भरभरून आणि चांगला अभ्यास केला तर सरस्वती आणि चांगले ज्ञान मिळेल.आणि त्यामुळे आर्थिक, सामाजिक प्रगती होईल,असाही सल्ला स्व.प्रिं.वामनराव(आप्पा) महाडिक जन्म शताब्दी सोहळ्याचे प्रमुख अतिथी डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छ.शिवाजी महाराज पुतळा व आप्पांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी चांदमल तारचंद बोरा महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाळकृष्ण लळीत,रमाकांत वरुणकर,शाळा समिती चेअरमन अरविंद महाडिक,डॉ.चित्रा ठाकूर,राधा कडुसकर, घनश्याम कडूसकर,शारदा भस्मे, विजय भस्मे,कश्मिरा महाडीक, प्रेषित महाडीक,संदीप कोळेकर, श्रीपाद मांजरेकर(माजी सभापती),
दिलीप तळेकर,नाधवडे मुख्याध्यापक संजय पाताडे,प्राचार्य अविनाश मांजरेकर आदी मान्यवर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.हा 0⁰कार्यक्रम प्रशालेच्या एम.डी. देसाई सांस्कृतिक भवनमध्ये पार पडला.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश बावधनकर म्हणाले की,महाराष्ट्र राज्याचा इतिहास ज्यांच्या नावाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही,असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे प्रिं.वामनराव महाडिक.विद्यार्थी आणि शिक्षक कसा असावा? हे देखील त्यांच्या वात्सल्यमुर्ती व्यक्तिमत्व अनुभवल्यानंतर लक्षात येते.

विशेष सत्कार
या जन्म शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेला सातत्याने सहकार्य करणारे दादा खटावकर,पत्रकार उदय दुदवडकर,मुख्याध्यापक महेंद्र पावसकर आणि संस्थेला जमीन दान केलेल्या देणगीदार यांचे नातेवाईक सुधीर ढेकणे,रोहित आणि हेमंत महाडिक,दिलीप तळेकर,आरती घाडी,उमेश कदम,हिरोजी तळेकर,रमाकांत वरुणकर यांचे शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला.तळेरेतील उद्योगपती राजु जठार यांनी विद्यार्थ्यांसाठी चप्पल स्टॅन्ड दिले.

यावेळी वामनराव महाडिक यांच्या जन्म शताब्दी सोहळ्यानिमित्त सुरू केलेल्या प्रिं.वामनराव महाडिक आदर्श शिक्षक पुरस्कार नाधवडे प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक संदीप कोळेकर यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम 5555/-देऊन गौरविण्यात आले.तर आप्पांचे चरित्र मुलांना समजावे, त्यांनी ते अभ्यासावे यासाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या मुलांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी अरविंद महाडिक,डॉ. प्रकाश बावधनकर,डॉ. बाळकृष्ण लळीत,प्राचार्य अविनाश मांजरेकर, मख्याध्यापक महेंद्र पावसकर यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.यावेळी रमाकांत वरुणकर,राजू जठार,संदीप कोळेकर,उदय दुदवडकर, दिलीप तळेकर,अरविंद महाडिक,तळेरे नं.1चे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, आणि दादा खटावकर यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला वामनराव महाडिक यांचे स्नेही ,प्रशालेचे माजी विद्यार्थी,शाळा समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, आप्पा प्रेमी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता सुर्वे,प्रास्ताविक व आभार डॉ. चित्रा ठाकूर यांनी मानले.

  • संबंधित पोस्ट

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    ​कणकवली  कळसुली  कै. बाबा डोंगरे गुरुजीं १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान  स्मृतीसंवाद कार्यक्रम ​कणकवली / सिंधुदुर्ग : काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात, मात्र त्यांचे विचार, संस्कार, कार्य आणि माणुसकीचा…

    पुढे वाचा

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुली   रुजाय फर्नांडिस  समाजसेवेचा  प्रवास ​कणकवली : वय अवघं २७ वर्षे… पण समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द मोठी! रक्तदानातून…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली कै. बाबा डोंगरे गुरुजींची १२ वी पुण्यतिथी; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व स्मृतीसंवादाने रंगला कार्यक्रम

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास

    अवघ्या २७ व्या वर्षी २२ वेळा रक्तदान, ३ वेळा प्लेटलेट्स दान! कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास
    कणकवलीत ‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ प्रदर्शन व खरेदी मेळ्याचे शानदार उद्घाटन!
    कळसुली जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे सरस्वती पूजन उत्साहात साजरा!

    मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!

    मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!
    भक्तिरस, लोककला अन् उत्साहाचा त्रिवेणी संगम : कळसुली इंग्लिश स्कूलमध्ये शारदोत्सव उत्साहात
    error: Content is protected !!