भक्तिरस,
लोककला
कळसुली इंग्लिश स्कूल
शारदोत्सव
कळसुली :
कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावे आणि पारंपरिक लोकसंस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने मुलांसाठी भजन स्पर्धा, तर मुलींसाठी फुगडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. के.आर.दळवी, व्हाईस चेअरमन श्री.नामदेव घाडीगावकर, श्री. भालचंद्र दळवी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री.प्रकाश दळवी- कळसुली शिक्षण संघ मुंबईचे सल्लागार, प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. व्ही. व्ही. वगरे शिक्षक-पालक संघ व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अनिल सावंत, सर्व मान्यवर सदस्य, माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये भजन स्पर्धा आणि फुगडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्याचे कै.जे.जे.दळवी यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणाऱ्या या स्पर्धांना पुरस्कृत श्री मिथिल दळवी तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अमर पवार प्रशालेचे शिक्षक हे होय
भजन स्पर्धेचा निकाल : इयत्ता पाचवी ते आठवी या प्राथमिक गटात प्रथम क्रमांक इयत्ता आठवीने, द्वितीय क्रमांक इयत्ता सातवीने, तर तृतीय क्रमांक इयत्ता पाचवी व सहावीच्या संयुक्त गटाने पटकावला. माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक इयत्ता नववीने, द्वितीय क्रमांक इयत्ता अकरावी व बारावीच्या संयुक्त गटाने, तर तृतीय क्रमांक इयत्ता दहावीने मिळवला.
फुगडी स्पर्धेचा निकाल : इयत्ता पाचवी ते आठवी या गटात प्रथम क्रमांक इयत्ता आठवीने, द्वितीय क्रमांक इयत्ता सहावीने, तर तृतीय क्रमांक इयत्ता पाचवीने पटकावला. माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक इयत्ता दहावीने, द्वितीय क्रमांक इयत्ता अकरावीने, तर तृतीय क्रमांक इयत्ता नववीने मिळवला.
भजन व फुगडी स्पर्धांचे परीक्षण माजी विद्यार्थी श्री. राकेश मिरजुले आणि श्री. शुभम मुंज यांनी केले. तसेच फुगडी स्पर्धेचे परीक्षण सौ. अनुजा दळवी आणि सौ. प्रियांका देसाई यांनी केले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून नुकत्याच पार पडलेल्या मूर्ती कला स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले सत्यनारायण पूजेचे मखर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. तसेच सत्यनारायण पूजेचे पुरोहित श्री. निळकंठ माधव मुंडले (माजी शिक्षक) यांची नात कु. मयुरी रजनीश मुंडले (इ . ९वी) हिने पूजेच्या औचित्याने सादर केलेले श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्र सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. अमर पवार, प्रशालेतील शालेय स्वराज्य सभा मुख्यमंत्री श्री. सागर गावकर व त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी मोलाचे योगदान दिले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून हा शारदोत्सव भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.








