भिरवंडे  श्री देव रामेश्वर मंदिर पुनर्बांधणी पायाभरणी शुभारंभ संपन्न

कणकवली प्रतिनिधी

 श्री देव रामेश्वर मंदिर भिरवंडेपुनर्बांधणी पायाभरणी शुभारंभ 

कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील श्री. देव रामेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार होणार असून भव्य दिव्य असे रामेश्वराचे मंदिर बांधकाम होणार आहे. मंदिर पुनर्बाधणीचा पायाभरणी आणि कोनशिला समारंभ नुकताच संपन्न झाला. सकाळी भव्यदिव्य अशा शोभायात्रेचे व कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभा यात्रेने भाविकांचे लक्ष वेधले. भक्तिमय वातावरण गावात निर्माण झाले होते आणि हजारो भाविकांची उपस्थिती लक्षनीय होती.

भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर बांधकाम हाती घेण्यात आले असून कोकणातील २१ व्या शतकातील भव्य असे रामेश्वराचे मंदिर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून उभे राहत आहे.

लिंगेश्वर मंदिरामध्ये अभिषेक करून त्यानंतर श्री. गणेश मंदिरापासून शोभायात्रा व कलश यात्रेला सुरुवात झाली. लेझीम पथक, ढोल पथक, वारकरी दिंडी हरिनामाचा जागर करत ओम नमः शिवाय, श्री. देव रामेश्वराचा जयघोष करत पारंपरिक वेशभूषा करून सौभाग्यवती महिला कलश घेऊन या शोभायात्रेतून व कलश यात्रे तुन रामेश्वर मंदिरापर्यंत पायी चालत अभिषेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सकाळी
आठ ते दहा वाजेपर्यंत शोभायात्रा त्यानंतर रामेश्वराच्या पिंडीवरील जलाभिषेकासाठी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावरील गंगा-यमुना-सरस्वतीचे पवित्र जल, नर्मदा परिक्रमेचे पवित्र जल आणि गोदावरी त्र्यंबकेश्वर येथील पवित्र जलाने श्री देव रामेश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक करून मंदिर पायाभरणी आणि कोनशिला स्थापित करून मंदिराचा पाया रचला गेला.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!