कणकवलीत ९ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत भव्य कणकवली पर्यटन महोत्सव – समीर नलावडे

कणकवली प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणा रा कणकवली पर्यटन महोत्सव ९ जानेवारी ते १२ या कालावधीत होणार 

इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत गायकांचा सहभाग

संगीत रजनी रंगणार , व्हिडिओ रिल स्पर्धा,
फुड फेस्टिव्हलसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

कणकवली शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरील
पटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत गायकांचा सहभाग असलेली संगीत रजनी, भाऊ कदम, कुशल बद्रिके यांची कॉमेडी, कणकवलीतील अडीचशेहून अधिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम, फुड फेस्टिव्हल, भव्य शोभायात्रा आदी कार्यक्रमांची मांदियाळी असणार आहे .अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडु हर्णे, भाजप‌ शहराध्यक्ष अण्णा कोदे ,राजा पाटकर, जावेद शेख आदी उपस्थित होते.

श्री. नलावडे म्हणाले, दरवर्षी आम्ही कणकवली नगरपंचायतीच्या वतीने पर्यटन महोत्सव आयोजित करतो. गेली दोन वर्षे नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट असली तरी आम्ही कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन महोत्सवाचा उपक्रम सुरू ठेवला आहे. यंदाही तेवढ्याच जल्लोषात कणकवली पर्यटन महोत्सव होणार आहे.

महोत्सवाचा शुभारंभ ९ जानेवारीला होईल. यात सायंकाळी ४ वाजता शहरातील सर्व सतरा प्रभागांतून कणकवली बाजार महोत्सव स्थळापर्यंत भव्य शोभा यात्रा निघणार आहे. त्यानंतर महोत्सव स्थळापर्यंत भव्य शोभा यात्रा निघणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडे सहा वाजता फुड फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. तर रात्री नऊ वाजता कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. महोत्सव कार्यक्रमानंतर अभिनेते भाऊ कदम, कुशल बद्रिके यांच्यासह अन्य कलाकारांचा सहभाग असलेला ‘जल्लोष’ हा कॉमेडी शो आणि ऑर्केस्ट्रा असा कार्यक्रम होणार आहे.

१० जानेवारीला कणकवली शहर आणि परिसरातील अडीचशेहून अधिक कलावंतांचा सहभाग असलेला ‘आम्ही कणकवलीकरांचा’ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रंगकर्मी हरिभाऊ भिसे, संजय मालंडकर, आणि सुहास वरूणकर दिग्दर्शित असलेला हा तीन तासाचा कार्यक्रम रात्री सात वाजता सुरु होणार आहे.

११ जानेवारीला रात्री आठ वाजता ‘बेधूंद’ म्युझिकल नाईट हा कार्यक्रम होणार आहे. १२ जानेवारीला माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पर्यटन महोत्सवाचा समारोप होणार आहे.

यावेळी कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समारोप कार्यक्रमानंतर नामवंत गायक, कलाकार यांचा सहभाग असलेला भव्य संगीत रजनीचा कार्यक्रम होणार आहे. याखेरीज रिल्स स्पर्धाही होणार आहे. तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांची रुपरेषा पुढील कालावधीत जाहीर केली जाणार असल्याची माहिती श्री. नलावडे यांनी दिली.

  • संबंधित पोस्ट

    फोंडाघाट येथील धबधब्यांचे सुशोभीकरण करा

    फोंडाघाट  धबधबा  सुशोभीकरण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची उपवनसंरक्षकांकडे मागणी कणकवली / प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील निसर्गरम्य धबधबे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून सुशोभिकरण करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी उपवनसंरक्षक…

    पुढे वाचा

    ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; सिनेसृष्टीवर आणि चाहत्यांवर शोककळा

    ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर  गोव्यात निधन; सिनेसृष्टीवर शोककळा   ​पणजी, ८ ऑक्टोबर २०२६: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अष्टपैलू अभिनयाची आणि रांगड्या व्यक्तिमत्त्वाची अमीट छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    फोंडाघाट येथील धबधब्यांचे सुशोभीकरण करा
    ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; सिनेसृष्टीवर आणि चाहत्यांवर शोककळा

    शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा मालवणात शुभारंभ मा.आ.जिल्हाप्रमुख वैभव नाईक,भाई गोवेकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेनेच्या सदस्य नोंदणीत तरुणांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक

    शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा मालवणात शुभारंभ मा.आ.जिल्हाप्रमुख वैभव नाईक,भाई गोवेकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेनेच्या सदस्य नोंदणीत तरुणांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक

    कणकवलीतील नगरपंचायत हद्दीतील जि.प. शाळांच्या समस्यांवर नगराध्यक्ष संदेश पारकर आक्रमक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घेतली भेट

    कणकवलीतील नगरपंचायत हद्दीतील जि.प. शाळांच्या समस्यांवर नगराध्यक्ष संदेश पारकर आक्रमक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घेतली भेट
    सिंधुदुर्गचे सुपुत्र समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त!
    कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव कार्यक्रम उत्साहात संपन्न; रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद!
    error: Content is protected !!