कणकवलीतील प्रसिद्ध बिल्डर उदय पवार यांच्या बिल्डिग्ला शॉर्ट सर्किटने आग लागून नुकसान

 

कणकवली (प्रतिनिधी) :

कणकवली सोंगेवडी येथिल बांधकाम व्यावसायिक उदय लवू पवार यांच्या कणकवली सोनगेवाडी येथील कृपासावली या बंगल्याला शॉर्ट सर्किट ने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झाली नाही. आग लागल्याचे समजताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पहाटे 4 वाजता नगरपंचायत च्या अग्निशामक बंबासह घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या आगीत बिल्डर उदय पवार यांच्या ऑफिसमधील सर्व महत्वाची कागदपत्रे फर्निचर जळून खाक झाले. घरातील टीव्ही एसी फर्निचर पीओपी जळाले. बिल्डर उदय पवार यांचा सोनगेवाडी येथे शेळके हॉस्पिटलनजीक पवार बिल्डिंग लगत दुमजली बंगला आहे. 18 डिसेंबर रोजी भल्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट ने त्यांच्या बंगल्यातील तळमजल्यावरील ऑफिसला आग लागली. त्यांनंतर ही आग पसरत हॉल मध्ये आली. उदय पवार व त्यांचे वडील लवू पवार हे पहिल्या मजल्यावर बेडरूम मध्ये झोपले होते. आगीमुळे तळमजल्यावरील जळत असलेल्या फर्निचर व अन्य साहित्याच्या आवाजामुळे व धुरामुळे त्यांना

लगत च्या पवार बिल्डिंगमधील नागरिकांनाही आगीमुळे जाग आली. स्थानिक नागरिकांनी घरातील पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका मोठा असल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. निखिल आचरेकर यांनी तात्काळ माजी नगराध्यक्ष समीर नलावडे याना घटनेची कल्पना देताच नलावडे यांनी तात्काळ कणकवली नगरपंचायत च्या अग्निशामक बंबासह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीमुळे पहिल्या मजल्यावर अडकलेल्या लवू पवार व उदय पवार यांना शिडीच्या साहाय्याने खाली उतरविण्यात आले. याबाबत माहिती मिळताच हवालदार चंद्रकांत झोरे यांनी घटनास्थळी प्राथमिक पंचनामा केला.

  • संबंधित पोस्ट

    कळसुली जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे सरस्वती पूजन उत्साहात साजरा!

    कळसुली जिल्हा परिषद शाळा नं. १  सरस्वती पूजन   ​सरस्वती मातेच्या पूजनासह महिला व विद्यार्थ्यांच्या फुगड्या, भजन आणि दांडिया नृत्याने कार्यक्रमात भरली रंगत ​कणकवली | कोकणराज लाईव्ह : कणकवली तालुक्यातील जिल्हा…

    पुढे वाचा

    मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!

    मालवण तालुका मैदानी स्पर्धl शिरवंडे ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’;  १६ खेळाडू जिल्हास्तरावर  | शिरवंडे (मालवण): त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे आयोजित करण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय मैदानी…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    कळसुली जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे सरस्वती पूजन उत्साहात साजरा!

    मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!

    मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडेच्या ‘त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालया’चे वर्चस्व; तब्बल १६ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड!
    भक्तिरस, लोककला अन् उत्साहाचा त्रिवेणी संगम : कळसुली इंग्लिश स्कूलमध्ये शारदोत्सव उत्साहात

    कणकवलीत ‘जयभवानी गोंधळी समाज संघा’च्या नवरात्रोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट!

    कणकवलीत ‘जयभवानी गोंधळी समाज संघा’च्या नवरात्रोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट!

    बांदा येथे सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा शानदार सोहळा; कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा बांदावासीयांकडून विशेष सत्कार!

    बांदा येथे सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा शानदार सोहळा; कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा बांदावासीयांकडून विशेष सत्कार!

    ओरोस बुद्रुकच्या दत्तकृपा      मित्रमंडळ नवरात्रोत्सवाला   नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट; दुर्गामातेचे घेतले दर्शन

    ओरोस बुद्रुकच्या दत्तकृपा      मित्रमंडळ नवरात्रोत्सवाला   नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट; दुर्गामातेचे घेतले दर्शन
    error: Content is protected !!