शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा मालवणात शुभारंभ मा.आ.जिल्हाप्रमुख वैभव नाईक,भाई गोवेकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेनेच्या सदस्य नोंदणीत तरुणांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक

शिवसेना सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील सदस्य नोंदणी

मालवण शुभारंभ

मा.आ.जिल्हाप्रमुख वैभव नाईक,

भाई गोवेकर 

शिवसेनेच्या सदस्य नोंदणीत तरुणांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक

मालवण प्रतिनिधी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा शुभारंभ आज माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शिवसेना शाखा येथे करण्यात आला. सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी मा.आ. वैभव नाईक यांनी केले.

मा.आ. वैभव नाईक म्हणाले,पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन शिवसेना कार्यरत आहे. महाराष्ट्र हितासाठी शिवसेनेने अनेक वेळा विरोधात राहून संघर्ष केला आहे.लोकांची छोटी मोठी कामे करण्याचे शिवसेनेचे ध्येय आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना लढा देत असून शिवसेनेने कधीही सत्तेसाठी आणि राजकारणासाठी हिंदुत्वाचा गैरवापर केलेला नाही.सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराविरुद्ध तरुण वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहे. त्या आंदोलनांना शिवसेनाच न्याय देऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्य नोंदणीत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.

याप्रसंगी शिवसेना मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, उपशहर प्रमुख उमेश मांजरेकर, महेश जावकर, महिला तालुका समन्वयक पूजा करलकर, शहर संघटिका राधिका मोंडकर, रूपा कुडाळकर, उमेश चव्हाण, सरपंच अमोल वस्त, सरपंच भगवान लुडबे, मयुर करंगुटकर, गौरी सावंत, पोईप उपविभागप्रमुख समीर लाड, छोटू सावजी, किशोर गावकर, मिनेश मयेकर, सुरेश मडये आदी शिवसैनिक उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; सिनेसृष्टीवर आणि चाहत्यांवर शोककळा

    ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर  गोव्यात निधन; सिनेसृष्टीवर शोककळा   ​पणजी, ८ ऑक्टोबर २०२६: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अष्टपैलू अभिनयाची आणि रांगड्या व्यक्तिमत्त्वाची अमीट छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर…

    पुढे वाचा

    कणकवलीतील नगरपंचायत हद्दीतील जि.प. शाळांच्या समस्यांवर नगराध्यक्ष संदेश पारकर आक्रमक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घेतली भेट

    कणकवलीतील नगरपंचायत  जि.प. शाळां समस्यां नगराध्यक्ष संदेश पारकर  शिक्षणमंत्री दादा भुसे  ​कणकवली : कणकवली शहरातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमधील अपुऱ्या भौतिक सुविधा, जीर्ण इमारती, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि अन्य…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; सिनेसृष्टीवर आणि चाहत्यांवर शोककळा

    शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा मालवणात शुभारंभ मा.आ.जिल्हाप्रमुख वैभव नाईक,भाई गोवेकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेनेच्या सदस्य नोंदणीत तरुणांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक

    शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा मालवणात शुभारंभ मा.आ.जिल्हाप्रमुख वैभव नाईक,भाई गोवेकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेनेच्या सदस्य नोंदणीत तरुणांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक

    कणकवलीतील नगरपंचायत हद्दीतील जि.प. शाळांच्या समस्यांवर नगराध्यक्ष संदेश पारकर आक्रमक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घेतली भेट

    कणकवलीतील नगरपंचायत हद्दीतील जि.प. शाळांच्या समस्यांवर नगराध्यक्ष संदेश पारकर आक्रमक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घेतली भेट
    सिंधुदुर्गचे सुपुत्र समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त!
    कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव कार्यक्रम उत्साहात संपन्न; रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद!

    शिरवंडे शाळेच्या ‘श्री गणेश चतुर्थी भेटकार्ड’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; इयत्ता आठवीच्या दुर्वा लुडबे हिने गोळा केली तब्बल १०,६५७ रुपयांची देणगी!

    शिरवंडे शाळेच्या ‘श्री गणेश चतुर्थी भेटकार्ड’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; इयत्ता आठवीच्या दुर्वा लुडबे हिने गोळा केली तब्बल १०,६५७ रुपयांची देणगी!
    error: Content is protected !!