कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव कार्यक्रम उत्साहात संपन्न; रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद!

कणकवलीत

‘उत्तरचंद्राची कोजागिरी’

अभिवाचन अनुभव 

रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद!

​कणकवली / प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हळवल येथे ‘आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल’ निर्मित आणि प्रस्तुत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ हा अनोखा अभिवाचन अनुभव कार्यक्रम अत्यंत उत्साहात सादर झाला. हळवल येथील ‘निलायम कृष्णकक्ष’ येथे रविवारी (०४ ऑक्टोबर २०२६) झालेल्या या प्रयोगाला कणकवलीतील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल’च्या सहसंपादक सानिका वायंगणकर यांनी उपस्थित मान्यवर श्रोत्यांचे स्वागत केले.

​दर्जेदार सादरीकरण आणि सहभागी कलाकार

​या कार्यक्रमाची संकल्पना व संहिता लेखन ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांची असून, यात प्रतिभावान कलाकारांच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.

​आजी: वैशाली पंडित

​आजोबा: संजय शिंदे

​सूत्रधार: अक्षय सातार्डेकर

​सहकलाकार: डॉ. सुमेधा नाईक

तालवाद्य: वैभव मांजरेकर

​संगीत संयोजन: विरेश वळंजू

​अभिवाचन, संवाद, संगीत आणि तालवाद्याच्या सुरेल संगमातून साकारलेल्या या कार्यक्रमातून रसिकांना अत्यंत दर्जेदार व मार्मिक अनुभव घेता आला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

​मान्यवरांकडून विशेष कौतुक

​सुप्रसिद्ध अभिनेते अभय खडपकर, सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी, लेखक महेश काणेकर, निमंत्रक स्वर्गानंद ट्रॅव्हल्सच्या वतीने गीता कामत व डॉ. वैशाली कोरगावकर, तसेच संपदा प्रभुदेसाई यांच्यासह उपस्थितांनी या कार्यक्रमाची भरभरून प्रशंसा केली. अभिवाचनाच्या माध्यमातून कथानुभव अधिक प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक अभिनव प्रयोग असल्याचे त्यांनी नमूद केले. हा प्रयोग लवकरच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशात पोहोचावा, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

​यावेळी त्रिंबक आजगावकर, देवयानी आजगावकर, दिनेश गोगटे, मेघा गोगटे, महेश सावंत यांच्यासह अनेक रसिक श्रोते उपस्थित होते. ‘निलायम कृष्णकक्ष’चे वामन पंडित, ज्योती पंडित तसेच ध्वनीसंयोजक श्री. डंबे व सहकारी यांच्या सहकार्याबद्दल चॅनेलच्या वतीने आभार मानण्यात आले.

​आगामी प्रयोग (वेळापत्रक)

​‘आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल’चे विशेष सांस्कृतिक समन्वयक त्रिंबक आजगावकर व सौ. देवयानी आजगावकर यांनी ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’च्या आगामी प्रयोगांची माहिती दिली असून, संपूर्ण संच खालील ठिकाणी प्रयोगासाठी सज्ज आहे:

​मालवण: दत्त मंदिर भरड — दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता

​वेंगुर्ले: बॅरिस्टर नाथ पै संकुल — दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्गचे सुपुत्र समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त!

     समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त! ​छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कार्यकारिणी बैठकीत महत्त्वपूर्ण निवड; कोकणासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव ​कणकवली / ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा साहित्य परिषद,…

    पुढे वाचा

    शिरवंडे शाळेच्या ‘श्री गणेश चतुर्थी भेटकार्ड’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; इयत्ता आठवीच्या दुर्वा लुडबे हिने गोळा केली तब्बल १०,६५७ रुपयांची देणगी!

    शिरवंडे शाळl ‘श्री गणेश चतुर्थी भेटकार्ड’ इयत्ता आठवी दुर्वा लुडबे  १०,६५७ रुपयांची देणगी! ​कणकवली / सिंधुदुर्ग : त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाचे औचित्य…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्गचे सुपुत्र समाजभूषण संदीप कदम कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्त!
    कणकवलीत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ अभिवाचन अनुभव कार्यक्रम उत्साहात संपन्न; रसिकांचा संस्मरणीय प्रतिसाद!

    शिरवंडे शाळेच्या ‘श्री गणेश चतुर्थी भेटकार्ड’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; इयत्ता आठवीच्या दुर्वा लुडबे हिने गोळा केली तब्बल १०,६५७ रुपयांची देणगी!

    शिरवंडे शाळेच्या ‘श्री गणेश चतुर्थी भेटकार्ड’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; इयत्ता आठवीच्या दुर्वा लुडबे हिने गोळा केली तब्बल १०,६५७ रुपयांची देणगी!

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    error: Content is protected !!