कळसुली गावाची अभिमानास्पद कामगिरी! ‘आदिशक्ती अभियाना’त तालुकास्तरावर प्रथम तर जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त

कळसुली गावाची अभिमानास्पद कामगिरी!

‘आदिशक्ती पुरस्कार’

तालुकास्तरावर प्रथम ,

जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक 

​कळसुली (ता. कणकवली) :

महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियाना’मध्ये कणकवली तालुक्यातील कळसुली गावाने चमकदार कामगिरी करत मोठा मान मिळवला आहे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्टपणे हे अभियान राबविल्याबद्दल कळसुली गावाला तालुकास्तरावर प्रथम क्रमांक (१ लाख रुपयांचे पारितोषिक) आणि जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक (३ लाख रुपयांचे पारितोषिक) जाहीर झाले असून, या यशाने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण  आहे.

​

.

​ दैदिप्यमान यशाची दखल घेत स्थानिक जिल्हापरिषद सदस्या सौ. शीतल दळवी यांनी आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर मजल मारल्याबद्दल सार्थ अभिमान व्यक्त केला आहे. कळसुली गावाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ‘आदिशक्ती अभियान समिती’च्या अध्यक्षा सौ. शुभदा (भारती) देसाई, सचिव श्रीमती माधवी दळवी तसेच इतर सर्व सन्माननीय सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला व त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

​या अभिनंदनाप्रसंगी व सत्कार करताना  माजी सरपंच अतुल दळवी, जयवंत गावकर, स्वप्निल गोसावी, अरुण दळवी, अमित दळवी, गणेश पाडावे, मोहन दळवी ,एकनाथ दळवी,   आदी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या सबलीकरणासाठी आणि गावाच्या प्रगतीसाठी ग्रामपंचायत व समिती सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीचे या वेळी उपस्थितांकडून भरभरून कौतुक करण्यात आले.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!