विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ :- फोंडा सरपंच सौ.संजना आग्रे

  1. कणकवली प्रतिनिधी

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट हायस्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात  पार पडले   विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ ठरत असल्या चा विश्वास सरपंच सौ.संजना आग्रे यांनी व्यक्त केला 

विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर फोंडाघाटचे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे शासनाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन सरपंच सौ.संजना आग्रे यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट येथे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच संजना आग्रे यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश सावंत, संस्था चेअरमन राजू पटेल,शिवसेना शिंदे गटाचे उपनेते संजय आग्रे, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, फोंडाघाटचे मुख्याध्यापक विजय रासम, प्रेरणा मांजरेकर,रंजन नेरुरकर आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सरपंच आंग्रे महणाल्या की,विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा सरपंच सौ.संजना आग्रे यांनी व्यक्त केली.विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या विज्ञान प्रदर्शनात खालील शाळा व विद्यार्थी विद्यार्थिनी यश मिळविले विद्यार्थी – प्रतिकृती माध्यमिक विभाग, प्रथम -कुमारी उमरसकर दिव्या. विद्या मंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली. द्वितीय-कुमारी वेंगुर्लेकर जागृती सुभाष, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट. तृतीय- नाणल सुश्रुत मंदार. आयडियल इंग्लिश स्कूल

शिक्षक प्रतिकृती प्राथमिक विभाग, प्रथम- पारधी सिताराम दत्ताराम. जिल्हा परिषद केंद्र शाळा साळीस्ते नंबर १. द्वितीय- जाधव भक्ती भाई. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे, कोतेवाडी. तृतीय-पेडणेकर जितेंद्र लक्ष्मण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवली नंबर १
शिक्षक प्रतिकृती माध्यमिक विभाग, प्रथम-श्रीमती भावे नूतन सुनील. वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तरळे. द्वितीय • राठोड विजयकुमार पांडुरंग न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रयोगशाळा सहाय्यक परिचर विभाग, प्रथम-चव्हाण अनिल मारुती, अ.वी. माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी. द्वितीय जाधव सहदेव केशव. नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करुळ.
निबंध स्पर्धा प्राथमिक विभाग, प्रथम-कु. सुतार वैष्णवी गजानन, अ. वी. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी. द्वितीय-कु. मेस्त्री अक्षता भालचंद्र. माध्यमिक विद्यालय कनेडी. तृतीय- चिंदरकर संकल्प नरेंद्र. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी.

निबंध स्पर्धा माध्यमिक विभाग प्रथम कु. रेडकर स्नेहल संतोष कणकवली कॉलेज, कणकवली द्वितीय कु. सावंत पूर्वा संतोष. एस. एम. हायस्कूल, कणकवली. तृतीय-रासम आर्या अविनाश, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट.
वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक विभाग प्रथम बोबकर हर्षिका दशरथ. न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट. द्वितीय- शेलार सलोनी सुरेंद्र. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदगाव मधली वाडी. तृतीय-कदम जागृती दिलीप.ल. गो. सामंत विद्यालय हरकुळ. तृतीय-हरकुळकर कर्तृत्वा विनायक. विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली.
वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक विभाग, प्रथम मुळीक अस्मित शैलेश. कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली-तेली शुभम मनोहर. कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली. द्वितीय-तायशेटे गौरेश श्रेयश, आयडियल इंग्लिश स्कूल, वरवडे-बागवे आयुष अवधूत, आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे. तृतीय-कोरगावकर आदित्य दीपक, माध्यमिक विद्यालय शिवडाव, केनी अनिरुद्ध विश्राम. माध्यमिक विद्यालय शिवडाव दीपक, माध्यमिक विद्यालय शिवडाव, केनी अनिरुद्ध विश्राम. माध्यमिक विद्यालय शिवडाव.

प्रश्नमंजुषा स्पर्धा माध्यमिक विभाग. प्रथम पूर्वा माधव, कणकवली कॉलेज कणकवली कुमारी प्रभुदेसाई कुमारी राणे सुकन्या संजय, कणकवली कॉलेज कणकवली. द्वितीय-मुल्ला मयविश इरफान, जूनियर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स आर्ट्स खारेपाटण – कुमारी माने पल्लवी दिलीप, जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स आर्ट्स, खारेपाटण तृतीय- तेंडुलकर ध्रुव आनंद. विद्यामंदिर कणकवली-कुमारी कारेकर सानवी रघुनाथ. विद्यामंदिर कणकवली

दिव्यांग विद्यार्थी प्राथमिक विभाग, प्रथम – भोवड रुद्र राजन न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट. द्वितीय- भितम बाबू भास्कर माध्यमिक विद्यालय, शेर्पे.

दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक विभाग, प्रथम – रावराणे दिवेश हेमंत, इंग्लिश स्कूल फोंडाघाट.

दोन दिवस चाललेल्या या विज्ञान सोहळ्यास शिक्षक वर्ग, अधिकारी, विद्यार्थी- विद्यार्थीनी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून लाभ घेतला

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

पुढे वाचा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

पुढे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे विसरू नका

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश
error: Content is protected !!