शिंदे सेनेच्या चिंतामणी मडव यांचा उबाठा सेनेत प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी

निलेश राणे नकोत म्हणून जांभवडे गावचे मानकरी चिंतामणी मडव व गजानन जांभवडेकर यांनी हाती घेतली मशाल 

निलेश राणेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या अधिपत्याखाली काम करण्यास आणि त्यांच्या वागणुकीला कंटाळून जांभवडे गावचे मानकरी आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते चिंतामणी मडव व गजानन जांभवडेकर यांनी मंगळवारी आमदार वैभव नाईक व उपनेते गौरीशंकर खोत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली. यावेळी पक्षाची शाल घालून व शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

वरिष्ठ नेतृत्वाने जरी निलेश राणेंचा शिंदे गटात प्रवेश घेतला असला तरी पदाधिकारी कार्यकर्ते मात्र त्यांना स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे अनेक कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेत आहेत. निलेश राणेंच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना देखील पदावरून हटविण्यात आले त्यावरून देखील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख महेश सावंत, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, आबा मुंज जांभवडे शाखाप्रमुख तेजस भोगले, घोटगे शाखाप्रमुख चंदन ढवळ, आंब्रड युवासेना विभागप्रमुख भावेश परब, हर्षद ढवळ, सुधीर भोसले आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

पुढे वाचा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

पुढे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे विसरू नका

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

error: Content is protected !!