आता दडपशाही खपवून घेणार नाही – संदेश पारकर

  1. सिंधुदुर्ग प्रतिनिधी.

दडपशाही खपवून घेणार नाही – संदेश पारकर

खूप झाली दहशत, खूप झाला भ्रष्टाचार आता आम्ही दडपशाही खपवून घेणार नाही. यंदाच्या विधानसभेत कणकवली आणि कुडाळ मतदारसंघात मतदार राणे बंधूंना पराभूत करतील. तसेच महाविकास आघाडीची सत्ता येईल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख तथा महाविकास आघाडीचे कणकवली मतदारसंघातील उमेदवार संदेश पारकर यांनी आज व्यक्त केला.

कणकवलीत आज भव्य रॅली काढून महाविकास आघाडीतर्फे संदेश पारकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर कणकवलीत श्री. पारकर यांच्या प्रचाराची जाहीर सभा झाली.

संदेश पारकर म्हणाले, राणेंना फक्त त्यांची दोनच मुले सज्जन आहेत. इतर सर्व जण त्यांना कारटी वाटतात. दोन मुले वगळता सर्वांनाच ते शिव्या घालतात. त्यामुळे त्यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. राणेंनी ३५ वर्ष सत्ता उपभोगली. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री ते केंद्रात उद्योगमंत्रीपदा पर्यंत गेले. पण या कालावधीत त्यांनी स्वतःची हॉटेल, स्वतःचे पेट्रोल पंप, मेडिकल
कॉलेज काढलं. सर्वसामान्यांसाठी काहीही केलंलं नाही. त्यामुळेच घराणेशाही, दडपशाही, भ्रष्टाचार विरोधातील आवाज बुलंद झाला आहे. जनसामान्यांच्या मनातील हा राग त्सुनामीच्या रूपाने बाहेर येईल

पारकर म्हणाले, अलीकडेच राज्य शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गात ३ हजार कोटींची कामं आणली गेली. त्याचे ठेकेदार निश्चित करण्यात आले. या प्रत्येक कामात १२ टक्के प्रमाणे ३६० कोटींचं कमिशन  खाल्लं असून तोच पैसा या निवडणुकीत वापरला जात आहे. याच पैशातून मतदार खरेदी केले जाणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी लढला नाहीत तरी चालेल पण विकले जाऊ नका. दरम्यान सध्या गावागावात स्वाभिमानचे कार्यकर्ते लपून आहेत. या कार्यकर्त्यांनी माझ्या एका कार्यकर्त्याला जरी हात लावला तरी त्याला तोडीस तोड उत्तर मिळेल असा इशाराही श्री पारकर यांनी दिला

यावेळी आमदार वैभव नाईक, विधानसभा मतदारसंघाचे प्रमुखशिवसेना नेते सतीश सावंत ,माजी खासदार हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार परशूराम उपरकर, उपनेते गौरीशंकर खोत,  महिला जिल्हा अध्यक्षा नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादीचे अनंत पिळणकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख ,आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, बाळू मेस्त्री, शिवसेना पदाधिकारी मान्यवर संदेश प्रेमी उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!