शिरवल गाव रंगणार!
‘रावण विधीलिखित’
संयुक्त दशावतार महानाट्य;
कणकवली प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाट्यक्षेत्रातील आघाडीचे कलाकार एकत्र येऊन आज शनिवार, दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ठिक १.०० वाजता एकाच मंचावर महानाट्य सादर करणार आहेत.शिरवल गाव हौशी नाट्यप्रेमी ग्रुप आयोजित ‘संयुक्त दशावतार महानाट्य – रावण विधीलिखित’ हा नाट्यप्रयोग श्री विठ्ठल रुक्माई मंदिर, शिर्वल (टेंबवाडी), ता. कणकवली येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ७.०० वाजता हरिपाठाने होईल, ज्याचे सौजन्य विश्वनाथ गवडळकर महाराज यांच्यातर्फे लाभले आहे. त्यानंतर रात्री ठीक ९.०० वाजता मुख्य दशावतार नाट्यप्रयोगाचा शुभारंभ होईल.
प्रमुख भूमिका व कलाकार:
या महानाट्यात सिंधुदुर्गच्या नामांकित दशावतार कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत:
- गणपती: बबन गुरव
- रावण: बाबा मयेकर
- अज राजा: दत्तप्रसाद शेणई
- राजा दशरथ: सागर गावकर
- कौशाल: गौरव शिर्के
- सटवी देवी: गोट्या येरागी
- कोसल्या: निळकंठ सावंत
- ब्रह्मदेव: उदय मोर्ये
- नारद: योगेश कोंडुरकर
- जंबू: प्रशांत मयेकर
- इंद्र: सुयश ठाकूर
नाट्याला सुरेल संगीतसाथ खालील कलाकारांनी दिली आहे:
- हामोनियम: मयूर गवळी
- पखावज: किसन नेमळेकर
- झांज: विनायक सावंत
तसेच या प्रयोगासाठी अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ,शिरवल (संचालक – गुरुनाथ मेसी) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे व्यवस्थापन शिरवल गाव हौशी नाट्यप्रेमी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते करत आहेत.
तरी समस्त नाट्यप्रेमींनी या संयुक्त दशावतार महानाट्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.



तसेच या प्रयोगासाठी अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ,शिरवल (संचालक – गुरुनाथ मेसी) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे व्यवस्थापन शिरवल गाव हौशी नाट्यप्रेमी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते करत आहेत.




