बँकेमार्फत ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा आयोजन – मनीष दळवी

 ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा 

– मनीष दळवी

प्रथम क्रमांकास ५० हजार,

द्वितीय ३० हजार,

तृतीय २० हजार

 एक लाख लिटर दूध

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :

जिल्ह्यामधील दूध उत्पादन वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत. सन २०१२ पासून गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) कोल्हापूर यांच्या मार्फत दूध संकलन सुरू झाले. सुरुवातीला ५०० लिटर दूध संकलन होत असताना ते आता २८,००० लिटर प्रतिदिन पर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यातील १२१ गावांमधील एकूण १४१ संस्था मार्फत दूध संकलन केले जाते, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मा. मनीष दळवी यांनी दिली.

पुढील पाच वर्षांत जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन प्रतिदिन एक लाख लिटर करण्याचे लक्ष्य बँकेने ठेवले असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा
जिल्ह्यातील दूध सहकारी संस्थांमधील व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार, डिजिटल व्यवहार, दूध संकलनात वाढ, सभासद सेवा आणि बँकेच्या व शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर यांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने ‘आदर्श दूध सहकारी संस्था स्पर्धा’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अध्यक्ष दळवी म्हणाले, “या स्पर्धेमुळे दूध सहकारी संस्थांमध्ये निरोगी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव होईल तसेच इतर संस्थांना आदर्श कामकाज करण्यास प्रेरणा मिळेल. यामुळे बँकेची दूध सहकारी संस्थांच्या सभासदांची बँकिंग सेवा वृद्धिंगत होण्यास मदत होईल.”

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येईल.
– प्रथम क्रमांक : रु. ५०,०००/-
– द्वितीय क्रमांक : रु. ३०,०००/-
– तृतीय क्रमांक : रु. २०,०००/–

ही तीन बक्षिसे सलग तीन वर्षे देण्यात येणार असून, बक्षिसे संस्थेच्या गरजेनुसार वस्तुरूप / साहित्य स्वरूपात देण्यात येतील.

या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक संस्थेने विहित नमुन्यातील माहिती *२० ऑगस्ट, २०२६ पर्यंत* बँकेकडे देण्याचे आवाहन अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!