पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील अँग्रिस्टँक फार्मर ID सक्ती शिथिल करण्यात यावी:मनिष दळवी

 कर्जमुक्ती योजना २०२६ मधील अँग्रिस्टँक फार्मर ID सक्ती शिथिल ……

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्याकडे पत्राद्वारे मनिष दळवी यांनी केली मागणी

सिधुनगरी (प्रतिनिधी)

          सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांना पत्र पाठवून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ मध्ये AGRISTACK फार्मर ID सक्तीचा न करण्याची विनंती केली आहे.
शासन निर्णयानुसार योजनेत माहिती भरताना फार्मर ID बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र कोकणासारख्या भागात खालील अडचणींमुळे खरे कर्जदार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
देवस्थान इनाम व कबुलायतदार जमिनी : कोकणात बहुतांश जमिनी देवस्थान इनाम किंवा महाराष्ट्र शासनाच्या नावे आहेत. शेतकरी वर्षानुवर्षे कसवत असले तरी ७/१२ त्यांच्या नावे नाही. त्यामुळे फार्मर ID तयार होत नाही.
मुंबई-पुण्यात वास्तव्य असलेले शेतकरी: अनेक शेतकरी नोकरीनिमित्त मुंबई-पुणे येथे राहतात. त्यांनी कुटुंबाच्या संमतीने गावातील व्यक्तीला शेती कसण्यास दिली आहे. संमतीपत्रावर बँकेने कर्ज दिले आहे, परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे फार्मर ID उपलब्ध नाही.
महिला कर्जदार : कुटुंबप्रमुखाच्या संमतीने महिलांना शेतीपीक कर्ज दिले आहे. ७/१२ नावे नसल्याने त्यांचा फार्मर ID होत नाही.
तोंडी कराराने शेती: स्वतःच्या नावे क्षेत्र नसलेले लहान शेतकरी तोंडी कराराने शेती करतात. नाबार्ड धोरणानुसार त्यांना कर्ज दिले जाते, मात्र फार्मर ID मिळणार नाही.

वरील सर्व शेतकरी बँकेकडून संस्थेमार्फत अल्प मुदत पीक कर्ज घेत असून कर्जमाफीस पात्र आहेत. केवळ फार्मर ID त्यांचे नावे होत नसल्याने ते योजनेपासून वंचित राहतील. वास्तविक अडचणी विचारात घेता, शासनाने फार्मर ID अनिवार्य असलेबाबतचा निकष शिथिल करावा जेणेकरून पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, अशी मागणी बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांनी पत्राद्वारे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्याकडे केली आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!