असलदे गावात गोवा बनावट दारु विक्री करणाऱ्यांना ग्रामस्थांचा दणका..

 गोवा बनावट दारु विक्री करणाऱ्यांना  दणका..

गावात दारुबंदी असताना दारु विक्रीची हिम्मत कशी करता? 

पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर

दारु विक्रेत्यांना विचारला जाब

कणकवली (प्रतिनिधी)

              असलदे गावात दारूबंदी असताना गोवा बनावटीची अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली आहे, नुकत्याच झालेल्या पोलिस कारवाईनंतर संबंधितांना जाब विचारत चांगलीच समज दिली. गावातील शांतता, सामाजिक वातावरण आणि युवकांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या अवैध दारू विक्रीला ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे.यावेळी संशयित आरोपी अवधूत शामसुंदर वाळके या अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमाने दारू विक्री करत असल्याची कबुली देत असलदे गावाची माफी मागितली. यापुढे गावात दारु विक्री करणार नसल्याचे माफी मागत जाहीरपणे सांगितले आहे

असलदे शिवाजीनगर येथे आरोपी अवधूत शामसुंदर वाळके यांच्या गोडाऊन कणकवली पोलिसांनी ७ जून रोजी रात्री १२.३० धाड टाकली. यानंतर गावात ग्रामसभेमध्ये दारूबंदी चा ठराव असताना देखील अवैध दारूचा व्यवसाय होत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. याबाबत मंगळवारी रात्री संशयित आरोपी अवधूत शामसुंदर वाळके तर सुरेंद्र वायंगणकर याला फोन करत कडक शब्दात दारू व्यवसाय बंद करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे, पत्रकार भगवान लोके, नरेंद्र हडकर,उपसरपंच सचिन परब,व्हाइस चेअरमन दयानंद हडकर,सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे,माजी सरपंच पंढरी वायंगणकर,महेश लोके, रघुनाथ लोके,प्रवीण डगरे,प्रदीप हरमलकर ,विजय आचरेकर,मनोज लोके,संदेश आचरेकर,अनिल लोके,दयानंद डगरे,विजय खरात, रुपेश खरात,गोविंद लोके,संतोष घाडी,संतोष डामरे,विष्णू डगरे,राजू जेठे,संदीप नरे ,प्रमोद डामरे आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

दारू विक्री करणाऱ्यांना विचारला जाब

गावात दारूबंदीचा निर्णय असताना काहीजणांकडून गोवा बनावटीची दारू विक्री सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये गेली १० ते १२ वर्षे तीव्र संताप निर्माण झालेला होता. त्यानुसार संशयित आरोपी अवधूत वाळके यांच्यावर पोलिसांनी असलदे गावात अवैध गोवा बनवतीचा दारू साठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.त्यामुळे नांदगाव तिठा येथे मंगळवारी सायंकाळी असलदे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्री.वाळके याला जाब विचारला .यावेळी तू गावात दारूबंदी असताना दारू विक्री का करतो? गावातील अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत त्याला जबाबदार कोण? गोव्याची विषारी दारू कमी पैशात आणून जास्त रक्कमेत विकून स्वतःचा फायदा करता का? विषारी दारु विकून दहा ते पंधरा जण मयत झाले आहेत त्याला जबाबदार कोण? अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, अनेक महिला विधवा झाल्या आहेत,मुले वाऱ्यावर आली आहेत, हे तुमच्यासारख्या लोकांमुळेच झाले झाले असल्याचा आरोप सरपंच चंद्रकांत डामरे, पत्रकार भगवान लोके, नरेंद्र हडकर, शत्रुघ्न डामरे,महेश लोके, दयानंद हडकर यांच्यासह ग्रामस्थांनी करत जाब विचारला .यावेळी दारूबंदी ही झालीच पाहिजे नाहीतर असलदे गाव गप्प बसणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे

 

पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन – भगवान लोके

नांदगाव दशक्रोशीतील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, तसेच गावातील सामाजिक सलोखा अबाधित राहावा, यासाठी असलदे ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र,काही व्यक्ती आर्थिक फायद्यासाठी गावाच्या निर्णयालाच हरताळ फासत आहेत. त्यांना गावातील सरपंच चंद्रकांत डामरे व ग्रामस्थांनी योग्य त्या शब्दात समज दिलेली आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल,असा इशारा पत्रकार भगवान लोके यांनी केली आहे.

दारूबंदी असताना दारु विक्री केल्यास गप्प बसणार नाही – चंद्रकांत डामरे

         असलदे गावात अवैध दारू विक्री, वाहतूक किंवा साठा आढळल्याने संशयित आरोपी अवधूत वाळके यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दारू विक्री गावाच्या हिताविरोधात आहे. त्याबाबत गावातील ग्रामस्थ गोळा होऊन अवधूत वाळके आणि फोन द्वारे सुरेंद्र वायंगणकर याला आम्ही समज दिलेली आहे.त्यामुळे लवकरच पोलिसांची भेट घेऊन निवेदन दिले जाईल, आमच्या गावात दारूबंदी असताना जर कोण ठरावाला बाधा आणत असेल,तर आम्ही सहन करणार नाही.पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी सांगितले.

पुन्हा गोवा बनावट दारुची विक्री करणार नाही-अवैध दारु फिरता..

मी असलदे गावामध्ये दारू विक्री करत होतो, माझ्याकडे दारूचा साठा असलदे गावात पोलिसांना आढळून आला.त्यानंतर गावातील सरपंच चंद्रकांत डामरे, पत्रकार भगवान लोके यांच्यासह ग्रामस्थांनी आम्हाला समज दिलेली आहे. गावांमध्ये दारु बंदी आहे,त्यामुळे यापुढील काळात मी गोवा बनावटीची दारु विक्री करणार नाही, अशी कबुली ग्रामस्थांना अवैध गोवा बनावटीची दारु विक्रेता अवधूत वाळके याने दिली आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश
    error: Content is protected !!