कणकवली नगराध्यक्ष संदेशभाई पारकर
श्रीक्षेत्र कुणकेश्वर
श्रावण सोमवार ,
अभिषेक
देवगड:
‘दक्षिण कोकणची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी उत्साही वातावरणात धार्मिक विध पार पडले. या पवित्र प्रसंगी कणकवली शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संदेशभाई पारकर यांना श्री कुणकेश्वर देवाच्या प्रथम पूजा करण्याचा बहुमान मिळाला.
![]()
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. देवाच्या अभिषेकानंतर आणि विधीयुक्त महापूजेच्या वेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कुणकेश्वर चरणी लीन होत कणकवली शहर आणि समस्त कोकणवासीयांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.
या धार्मिक आणि मंगल प्रसंगी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला. या सोहळ्याला अध्यक्ष एकनाथ तेली उपाध्यक्ष गणेश वाळके सचिव हेमंत वातकर खजिनदार उदय पेडणेकर सदस्य संजय वाळके विलास वाळके मंगेश पेडणेकर महेश जोईल प्रमोद साटम दीपक घाडी,तसेश. स्थानिक नागरिक, भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.









