पोखरण माध्यमिक विद्यालय
रोटरी क्लब कणकवली
‘स्टडी ॲप’चे वितरण
कणकवली प्रतिनिधी
पोखरण गावच्या माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब कणकवलीच्या वतीने आज ‘स्टडी ॲप’चे उत्साहात वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.

या महत्त्वाच्या उपक्रमासाठी रोटरी क्लब कणकवलीचे माजी प्रेसिडेंट दीपक बेलवलकर यांचे बहुमूल्य अर्थसहाय्य लाभले. कार्यक्रमात ॲप डिस्ट्रीब्यूटर म्हणून माजी प्रेसिडेंट वर्षा बांदेकर, ॲप्स गाईड म्हणून माजी प्रेसिडेंट नितीन बांदेकर, तसेच माजी प्रेसिडेंट महेंद्र मूरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. श्यामसुंदर सावंत यांच्या प्रास्ताविकाने झाली. शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक तथा स्थानिक कमिटी अध्यक्ष प्रशांत तावडे यांनी केले. या संपूर्ण ॲप वितरण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. शैली सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.
या प्रसंगी स्थानिक कमिटी सचिव सचिन सावंत यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









