कणकवली प्रतिनिधी
कणकवली विधानसभा निवडणूक लढवत आहे. नितेश राणे हे मुस्लीम समाजाला ज्या पद्धतीने बोलताहेत ही भाषा चुकीची आहे. आमचा समाज कदापी ही भाषा सहन करणार नाही. त्यांच्या या वक्तव्यांचा राज्यात आणि देशात समाजामध्ये असंतोष आहे. यामुळेच सर्व समाजाच्या पाठिंब्यामुळे निवडणुकीला सामोरे जात आहे. मुस्लीम समाजाचे संदेश पारकर यांना म्हणजे नितेश राणेंना मत आहे. मुस्लीम समाजाविरोधात बोलणाऱ्या नितेश राणेंना रोखण्यासाठी मी मैदानात उतरल्याची भावना अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी व्यक्त केली.
माझ्यावर विनाकारण संदेश पारकरयांनी राणेंचा उमेदवार असल्याची टीका केली. त्यामुळे संदेश पारकर हे कोणाचे उमेदवार आहेत. हे १० तारीखला पुराव्यानिशी जनतेसमोर मांडणार आहे. मला निवडणूक लढवणे तेवढे सोप नाही. कारण पैशाच्या जोरावर, गुंडागर्दी आणि धमकावण्याचे प्रयत्न होत आहेत. या संकटांना न घाबरतास माजाच्या पाठिंब्यावर आणि सर्व सामाजाला सोबत घेऊन या निवडणुकीत मी विजयी होईन.
या मतदारसंघात अल्पसंख्याक चेहरा नेतृत्व करणार आहे. हे सर्व जनतेला मान्य आहे. देशाला सर्व धर्माच्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिल्याची आठवण अपक्ष उमेदवार देतो

आ. नितेश राणे गेली १० वर्षे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी माझे वैयक्तिक नुकसान केले नाही. मला वैचारिक विचार तसेच त्यांनी समाजात तेढ निर्माण केला आहे, त्याला माझा विरोध आहे. संदेश पारकर हे निवडून आल्यानंतर कशावरून भाजपमध्ये जाणार नाही, आमची फसवणूक करणार नाही. संदेश पारकर यांना मत म्हणजे भाजपला मत आहे, आतून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अमित शाह यांची बैठक सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र येण्याचे विचार चालू आहेत. तेव्हा आमची फसवणूक होणार नाही का? मतदान करताना योग्य पद्धतीने अल्पसंख्याक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन अपक्ष उमेदवार बंदेनवाज खाणे यांनी केला आहे








