*कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघात संवाद बैठकांचे आयोजन

 कणकवली प्रतिनिधी 

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे १२ नोव्हेंबरला बैठकांचे आयोजन;कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी साधना थेट संवाद
कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघात संवाद बैठकांचे आयोजन
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे असणार विशेष उपस्थितीत
भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांनी दिली माहिती

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार नीतेश राणे यांच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे यांची कणकवली विधानसभा मतदारसंघात मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी बैठकांचे आयोजित करण्यात आले आहे.अशी माहिती भाजपा कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर उपस्थित होते. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे , खासदार नारायण राणे हे भाजप महायुतीच्या कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत.त्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रहार भवन येथे बैठक होणार आहे.त्यानंतर देवगड तालुक्यातील फणसगाव कॅन्टीन येथील डॉ नारकर यांच्या निवासस्थानी दुपारी ३ वाजता बैठक होणार आहे. सायंकाळी ५ वाजता वैभववाडी शहरात भाजपा कार्यालय येथे बैठक होणार आहे. या सर्व बैठकांना आमदार तथा उमेदवार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महायुती च्या घटक पक्षांतील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष ,तालुकाध्यक्ष आदी पदाधिकारी या संयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत. देवगड तालुक्याचे सुपुत्र असलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघातून महायुती चे उमेदवार नितेश राणे यांचे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजय होण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. राष्ट्रीय सरचिटणीस तावडे यांनी देश पातळीवर जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश बिहार राज्यात त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वी पार पाडत भाजपाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनामुळे भाजपासह महायुती चे कार्यकर्ते अधिक जोमाने आमदार नितेश राणे यांचा न भूतो अशा विक्रमी विजयी हॅट्ट्रिक साठी काम करतील असे मनोज रावराणे यांनी सांगितले. Mm

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!