मोठी स्वप्ने,सुसंगत कृतीनेच सामाजिक संस्थेला उभारी – डॉ महेश अभ्यंकर

कणकवली प्रतिनिधी…

मालवण टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेचे ‘व्हिजन वर्कशॉप. मोठी स्वप्ने,सुसंगत कृतीनेच सामाजिक संस्थेला उभारी – डॉ महेश अभ्यंकर

       टोपीवाला हायस्कूल मालवण माजी

विद्यार्थी संघटनेचे ‘व्हिजन वर्कशॉप’ मुंबई हॉटेल रेसिडेन्सी, अंधेरी येथे आयोजित करण्यात आले. टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ महेश अभ्यंकर यांनी या कार्यशाळेचे आयोजन करून माजी विद्यार्थ्यी संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने काय व कसे प्लॅनिंग करायला हवे या विषयावर चर्चासत्र घेतले. सिंधुदुर्ग, पुणे, अलिबाग, मुंबई येथून आलेल्या माजी विद्यार्थ्यी/विद्यार्थिनीनी या कार्यशाळेस उपस्थित राहून आपली मते मांडली. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले व प्रगल्भ अनुभव असलेले विद्यार्थी एकत्र आल्यामुळे विचारांना चालना मिळाली.

संस्थेची उद्दिष्टये, मूल्ये, दहा वर्षाचे ध्येय, कृतिआराखडा अश्या विविध मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली. माजी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे आठ गट पाडून विविध विषयावर आधारित उद्दिष्टांवरील मुद्दे, आव्हाने यावर प्रश्नावली देण्यात आली. सर्व गटांचा १००उस्फूर्त प्रतिसाद होता. आठही गटांनी कार्यशाळेच्या शेवटच्या टप्प्यात आपापल्या विषयांवर आधारित कोणकोणते उपक्रम, कार्यशाळांचे आयोजन करता येईल यावर प्रेझेंटेशन दिले. एकाच गावात, एकाच शाळेत शिकलेले विद्यार्थी एकत्र आल्याने वातावरण ही मैत्रीपूर्ण होते.
“शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी यांच्यावर सकारात्मक परिणाम करणारे प्रकल्प निवडा, नियोजनात सुसूत्रता आणा, प्रकल्पांची अंमलबजावणी सुकर करण्यासाठी मनुष्य बळ, निधी संकलन याची सांगड घाला आणि सर्वसमावेशक सांघिक नेतृत्वाच्या जोरावर मोठी झेप घ्या” असे विचार डॉ महेश अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
‘व्हिजन वर्कशॉप’ खरोखरीच संघटनेच्या कामासाठी योग्य दिशा दाखवणारा नकाशा ठरला. सर्व माजी विद्यार्थ्यांना नव्या जोमाने काम करण्यास नक्कीच ही कार्यशाळा प्रेरणादायी ठरली.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!