नाचणीपिठाचे कोकणी शिरवाळे कर्नाटक राज्यस्तरीय स्पर्धेत ठरले अव्वल!

नाचणीपिठाचे कोकणी शिरवाळे कर्नाटक राज्यस्तरीय स्पर्धेत ठरले अव्वल!
व्हाया कर्नाटक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता…!

आज सकाळी आम्ही आमच्या कणकवली विद्यामंदिर हायस्कूल मधील १९७५ सालच्या जून्या ११ वी च्या बैचचे , वयाची अडूसष्ठी गाठलेले वर्ग मित्रमैत्रिणी बर्याच वर्षांनी एकत्र भेटलो.तो अपूर्व आनंदाचा क्षण होता. या भेटीत हायस्कूल मधील अनेक आठवणी निघाल्या. खूप छान वाटले…
असे भेटण्याचे कारणही अभूतपूर्व आणि अभिमानास्पद होते. आमची इयत्ता आठवीपासूनची वर्ग मैत्रीण अनिता रेवणसिध्द उचले म्हणजे कणकवली चे नगरशेठ , कणकवलीच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास प्रक्रियेतील एक अग्रगण्य व्यक्तीमत्व अशा बाळासाहेब उचले यांची कन्या, कणकवलीतील प्रथितयश व्यापारी आबा आणि मोहन उचले यांची बहीण!
अनिता चे सासर कर्नाटक राज्यातील गोकाक…!जगप्रसिद्ध गोकाक धबधबा सर्वज्ञात आहेच. अशा जगप्रसिद्ध गावात अनिता चे घर आहे. अनिताचे पती महेश हे प्रथितयश व्यवसायिक , व्यापारी होते . बागायती शेतीही उत्तम करीत..तो सर्व व्यावसायिक भार अनिता ने सांभाळला आता मुलगा सांभाळतो.
गेल्याच महिन्यात अनिता उचले हिने मिळविलेल्या अपूर्व यशाबद्दल तिचे कर्नाटक चे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते बंगलोर येथे आयोजित राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावरील खास कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनी आहारात तृणधान्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.असे आवाहन केले आहे.. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, कर्नाटक राज्य सरकारने जिल्हा ते राज्य स्तरावर गृहिणींची तृणधान्यांच्या पदार्थाची पाककला स्पर्धा आयोजित केली होती . त्या स्पर्धेत कर्नाटकातील प्रत्येक जिल्हा स्तरावर शंभर गृहिणींचा सहभाग असलेली पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . अनिताने गोकाक जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. कणकवली च्या या कोकण कन्येने ” नाचणीच्या पिठाचे शिरवाळे आणि त्यासोबत नारळाच्या दुधात गूळ घालून केलेला रस ! हा अस्सल मालवणी.. कोकणी पदार्थ बनविला होता. नाचणी हे एकेकाळी गरिबांचे खाद्य म्हणून ओळखले जात असे. ते भरपूर आरोग्यदायी असल्याने आता त्याला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे..असो. तर अनिताने त्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे तिची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. राज्य स्तरीय स्पर्धेसाठी कर्नाटक राज्यातील तेहतीस जिल्ह्यातील प्रथम क्रमांक विजेत्या तीस गृहिणी स्पर्धक होत्या. त्यामुळे ती राज्य स्तरीय स्पर्धा तेव्हढीच अटीतटीची होती. बंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या त्या स्पर्धेसाठी देश-विदेशातील पंच व सप्त तारांकित हाँटेलमधील नामांकित शेप आले होते. स्पर्धा थेट लाईव्ह होती. अन् जिल्हास्तरीय स्पर्धेत जो प्रथम क्रमांक विजेता पदार्थ बनविला होता … तोच संपूर्ण पदार्थ दीड तासात लाईव्ह करायचा होता.
त्या राज्य स्तरीय स्पर्धेतही आमच्या कोकण कन्या अनिता ने प्रथम क्रमांक पटकावला. अन् अस्सल कोकणी… मालवणी शिरवाळ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून दिली. देश-विदेशातील परिक्षक आणि तारांकित हाँटेलमधील नामांकित शेपनी अनिता ने बनविलेल्या मालवणी शिरवाळ्याची खूप तारीफ केली. कोकण च्या नाचणी च्या शिरवाळ्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे… ते बनविण्याची अनिता ची रेसिपी प्रकाशित करण्यात आली आहे. त्या राज्य स्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबध्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते अनिता चा सत्कार करुन गौरविण्यात आले.
चार दिवसांपूर्वी अनिता कणकवलीला माहेरी आली आहे..ही संधी साधून आम्ही तिच्या वर्गमित्रमैत्रीणींनी तिचा भाऊ, आमचाही मित्र आबा उचले याच्या निवासस्थानी तिचा सत्कार केला. यावेळी तिचा मोठा भाऊ मोहन आणि मोठी बहीण सौ.लता , भावोजी भालचंद्र गोडवे ( मीरज) वहिनी , सुना नातवंडे उपस्थित होते. आम्ही मित्र प्रविण पारकर, नंदकिशोर उर्फ राजू गुरसाळे, विजय पारकर, शेखर उचले, मारूती उर्फ राजन मुंज, बाळा मेस्त्री, रत्नाकर परब, आणि लेखक, संपादक/पत्रकार/माधव कदम. उपस्थित होतो.
हे वर्ष आमच्या विद्यामंदिर हायस्कूल मधील १९७५ च्या बैचचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे…. अनिता उचले हिच्या या कर्तबगारी बद्दल तिच्या सर्व वर्गमित्रमैत्रीणींना तिचा अभिमान वाटतो.

———————————————————.
कर्नाटक चे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे राज्य स्तरीय स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या अनिता उचले हिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविले

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश
    error: Content is protected !!