गणेशोत्सवानिमित्त आमदार प्रमोद जठार यांचा जनसंपर्क दौरा; कणकवली तालुक्यातील डामरे येथे घेतली बाप्पाची भेट

गणेशोत्सव

आमदार प्रमोद जठार

 जनसंपर्क दौरा;

कणकवली डामरे   

बाप्पाच दर्शन

​कणकवली:

​गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण कोकणात सध्या आनंदाचे, भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. घरोघरी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, नागरिक मोठ्या भक्तिभावाने बाप्पाची सेवा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, आमदार प्रमोद जठार यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध गणेश भक्तांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेण्याचा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

​डामरे गावात जनसंपर्क अधिकारी चंद्रहास सावंत यांच्या घरी लावले हजेरी

​याच जनसंपर्क दौऱ्याचा एक भाग म्हणून, आमदार प्रमोद जठार यांनी कणकवली तालुक्यातील डामरे गावाला सदिच्छा भेट दिली. डामरे येथील रहिवासी, आमदार प्रमोद जठार यांचे निष्ठावान जनसंपर्क अधिकारी तसेच कणकवली पंचायत समितीचे सक्रिय सदस्य श्री. चंद्रहास (बबलू) सावंत यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे त्यांनी मनोभावे दर्शन घेतले.

​आमदार प्रमोद जठार यांच्या आगमनाने सावंत कुटुंबात आणि डामरे गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी श्री. चंद्रहास (बबलू) सावंत यांच्यासह संपूर्ण सावंत कुटुंबिय परिवार उपस्थित होता. आमदार जठार यांनी बाप्पाचे दर्शन घेऊन सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. तसेच, या भेटीदरम्यान त्यांनी सावंत कुटुंबाशी आणि उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधत सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

​गणेशोत्सवाच्या या पवित्र दिवसांत कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे आणि आनंदात सहभागी होण्याच्या आमदार जठार यांच्या या भूमिकेमुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!