कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान घडलेल्या वादावर पडदा; मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

 अतिक्रमण हटाव मोहिम

घडलेल्या वादावर पडदा;

मुख्याधिकारी गौरी पाटील

यांच्याकडून दिलगिरी 

​

​पत्रकारांची दिलगिरी: कणकवलीत वृत्तसंकलन करताना झालेल्या वादावर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी व्यक्त केली दिलगिरी.

​पत्रकारांचे सहकार्य: “कणकवलीतील पत्रकारांमुळेच अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी झाली,” मुख्याधिकारी गौरी पाटील यांची कबुली.

आश्वासन: भविष्यात पत्रकारांच्या वृत्तांकनास कोणताही अटकाव केला जाणार नाही, असे स्पष्टीकरण.

​कणकवली:

कणकवलीत उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर, नगरपंचायतीच्या वतीने फळ व भाजी विक्रेत्यांसाठी तात्पुरत्या जागेचे मार्किंग करण्याचे काम सुरू होते. या घटनेचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना छायाचित्रण आणि चित्रिकरण करण्यास मज्जाव करत फौजदारी गुन्ह्याचा इशारा देण्यात आला होता. या प्रकारामुळे कणकवलीतील पत्रकारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

​याप्रकरणी कणकवली तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी नगरपंचायतीत जाऊन मुख्याधिकारी गौरी पाटील यांची भेट घेतली आणि या प्रकारचा निषेध नोंदवला. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे सांगत पत्रकारांनी याबाबत जा विचारणा केली.

​मुख्याधिकारी गौरी पाटील यांची स्पष्टोक्ती

 चर्चेदरम्यान मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्पष्ट केले की,

​”कणकवलीत आल्यापासून पत्रकारांच्या सहकार्यामुळेच मला चांगली कामे करता आली आहेत. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवताना पत्रकारांच्या सहकार्यामुळे मोठे पोलीस संरक्षण घेण्याचीही गरज भासली नाही. माझ्या मनात पत्रकारांबद्दल नितांत आदर आहे. मात्र, त्या दिवशी घटनास्थळी मोठा जमाव गोळा झाल्यामुळे अनावधानाने काही शब्द मुखातून आले असतील. जर यामुळे पत्रकारांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करते.”

​भविष्यात अशा प्रकारचा कोणताही अटकाव पत्रकारांच्या वृत्तांकनास केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सकारात्मक चर्चेनंतर दोन्ही बाजूने वाद मिटवण्यात आला असून, पुढील काळातही शहर विकासासाठी परस्पर सहकार्य कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

​ बैठकीला प्रदेश प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ, तालुकाध्यक्ष भगवान लोके, पत्रकार हल्ला कृती समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत भावे, माजी अध्यक्ष चंद्रकांत देसाई, अजित सावंत, सुधीर राणे, विरेंद्र चिंदरकर, सहसचिव दर्शन सावंत, खजिनदार रोशन तांबे, राजेश सरकारे, उमेश बुचडे, दिगंबर वालावलकर, राजेंद्र दळवी, तुषार हजारे, मयूर ठाकूर, राजन चव्हाण, भास्कर रासम, संजय बाणे,  साहिल बागवे, मिलिंद पारकर यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!