कणकवली प्रतिनिधी
कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार वंदे नवाज खाने यांनी प्रचाराचा धूम धडाका लावला असून कलमठ,वरवडे मुस्लिमवाडीत ; सह सर्व गावांपर्यंत प्रचार केल्याचा बंदेनवाज खानी यांचा दावा
कणकवली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत गावभेत संपर्क अभियान जोरदार राबविले आहे. कणकवली तालुक्यातील कलमठ, वरवडे मुस्लिमवाडी त्यांनी प्रचार केला.

कणकवली विधानसभा मतदार संघातील तीनही तालुक्यांमध्ये जोरदार प्रचार राबवत मतदार संघात महायुतीचे उमेदवार नितेश राणे व महाविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्यासमोर आव्हान अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी उभे केले आहे. या मतदार संघात एकमेव मुस्लीम समाजाचे अपक्ष उमेदवार असलेले बंदेनवाज खानी यांना अल्पसंख्याक समाज व सर्व जातीधर्माचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.








