कवी सफरअली इसफ यांना इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचा वसंत- कमल काव्य पुरस्कार …

सिंधुदुर्ग प्रतिनिधी

कवी सफरअली इसफ यांना इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचा वसंत- कमल काव्य पुरस्कार …5 जानेवारी रोजी इचलकरंजी येथे कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या हस्ते होणार गौरव

इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे यांची माहिती

इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या वसंत-कमल स्मृती काव्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून सदर पुरस्कार कोकणातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ (वैभववाडी तिथवली) यांच्या दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या बहुचर्चित ‘अल्लाह ईश्वर ‘ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिली.
सदर पुरस्काराची निवड नामवंत समीक्षक समीक्षक प्रा. डॉ.रणधीर शिंदे, आणि लेखक -समीक्षक प्रा.डॉ रमेश साळुंखे यांच्या परीक्षण समितीने केली असून ५ जानेवारी रोजी इचलकरंजी येथे होणाऱ्या साहित्य संस्कृती संमेलनात संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकर कृष्णात खोत यांच्या हस्ते सदर पुरस्कार देऊन कवी सफरअली यांना गौरविण्यात येणार आहे. ‘अल्लाह ईश्वर ‘ मधील कविता आजच्या जातीय धार्मिक ध्रुवीकरणाकडे निर्देश करताना माणूस कसा विभागला गेला आहे याचचे भेदक वास्तव सांगते. माणसाचा माणसावरचा विश्वास उडून जावा इतका माणूस अधिक वर्चस्ववादी झाला आहे. या वर्चस्ववादी वृत्तीचा बळी अल्पसंख्यांक गट ठरत असून या सगळ्याची चिकित्सक मांडणी करताना या कवितेत कुणाबद्दलही कटुता नाही हे या कवितेचे सर्वात महत्वाचे मोल आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘अल्लाह ईश्वर’ काव्यसंग्रहाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे पुरस्कार निवड समितीने म्हटले आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!