हॉटेल व्यवसायिक
‘आर्थिक लूट’
अन्न व औषध प्रशासन
नगरसेवक बंडू हर्णेचा
कणकवली:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून हॉटेल व्यवसायिकांच्या तपासणीच्या नावाखाली सुरू असलेल्या मोहिमेवर नगरसेवक बंडू हर्णे यांनी गंभीर आक्षेप नोंदवला आहे. प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीचे स्वागत करत असतानाच, स्थानिक स्तरावर खाजगी लॅबच्या माध्यमातून सुरू असलेल्या भरमसाठ शुल्क वसुलीकडे हरणे यांनी लक्ष वेधले असून, हा प्रकार म्हणजे व्यवसायिकांची उघड लूट असल्याचे त्यांनी म्हटले आहे
नगरसेवक बंडू हर्णे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांनुसार, प्रशासनाची स्वतःची यंत्रणा सक्षम नसताना खाजगी एजन्सीच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. याचे परिणाम थेट हॉटेल चालकांच्या खिशावर होत आहेत
शुल्कातील तफावत: सरकारी लॅबमध्ये पाणी तपासणीचे शुल्क ९४० रुपये असताना, खाजगी लॅब यासाठी २३०० रुपये घेत आहे. याशिवाय प्रत्येक अन्नपदार्थाच्या नमुन्यासाठी १००० रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत, ज्यामुळे एका व्यवसायिकाला हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे
नमुन्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह: तपासणीसाठी गोळा केलेले नमुने दिवसभर व्हॅनिटी व्हॅनमध्ये ठेवले जातात. १२ तासांच्या कालावधीनंतर हे नमुने तपासणीसाठी योग्य राहतात का? तसेच, यातून चुकीचे रिपोर्ट देऊन दंड आकारला जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे
“प्रशासनाने स्वच्छता राखावी, नियमांचे पालन करून घ्यावे, हे आमचे स्वागतच आहे. मात्र, या सुधारणेच्या नावाखाली व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे,” अशी टीका बंडू हर्णे यांनी केली मालक कारवाईच्या भीतीने आवाज उठवण्यास घाबरत आहेत, ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले
प्रशासनाला इशारा
जिल्ह्यात पीयूसी (PUC) किंवा इतर नियमांची अंमलबजावणी करताना जशी प्रशासनाने पूर्ण यंत्रणा उभी होईपर्यंत शिथिलता दिली होती, तशीच भूमिका हॉटेल तपासणीबाबतही घ्यावी, अशी मागणी हर्णे यांनी केली आहे जोपर्यंत जिल्हा प्रशासनाची स्वतःची सक्षम लॅब उभी राहत नाही, तोपर्यंत खाजगी एजन्सीची लूट खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे








