वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करावी

कणकवली प्रतिनिधी

वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्याचं ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आवाहन 

वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात यावी अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे. सदर मेलची प्रत अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व अध्यक्ष /सचिव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांना पाठविण्यात आली आहे.
कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा करुळ घाटमार्ग रस्ता दुरुस्तीसाठी डिसेंबर २०२३ पासून बंद आहे. करुळ घाटातून होणारी वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली होती. पावसाळ्यामध्ये घाट नादुरुस्त असल्याने दोन महिने वाहतूक बंद होती. त्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु सायंकाळी पाच नंतर भुईबावडा घाटमार्गे होणारी फक्त एसटी वाहतूक पूर्ण बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी प्रवाशांना आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत एसटी प्रवासी ग्राहकांच्या तोंडी आणि लेखी तक्रारी शाखेकडे आल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा एसटी प्रशासनाने वैभववाडी भुईबावडा घाटमार्गे होणारी एसटी वाहतूक पूर्ववत करून सर्व एसटी प्रवासी ग्राहकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने मेलव्दारे केली आहे.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!