शिवडाव माध्यमिक विद्यालय
मोफत वह्या वाटप;
शिक्षणासाठी तडजोड नाही –
संदेश (गोट्या) सावंत
कणकवली, दि. ४ ऑगस्ट :

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव येथे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
युवा संदेश प्रतिष्ठान, नाटाळ-सांगवे व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा मोठा आधार मिळाला. विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
“विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कुठलीही तडजोड होणार नाही”
यावेळी मार्गदर्शन करताना मा. श्री. संदेश (गोट्या) सावंत म्हणाले, “शिवडाव हायस्कूल आणि येथील प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी माझी आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ दिली जाणार नाही. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.”

कार्यक्रमादरम्यान शाळेच्या विकासासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सावंत साहेब यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यामध्ये—
शाळेसाठी प्रशस्त सभागृह (हॉल) उभारणे.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी बस सेवा सुरू करणे.
शाळेतील रिक्त शिक्षक पदे तातडीने भरणे.
या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन सावंत साहेब यांनी दिले.
यावेळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मुकेश पवार, शालेय समितीचे खजिनदार श्री. कृष्णा गावकर, शालेय समितीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. नितीन गावकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. चंदू शिरसाट, श्री. अभिषेक नाडकर्णी, श्री. नितीन हरमलकर, सोसायटी चेअरमन श्री. किरण गावकर, बूथ अध्यक्ष श्री. मकरंद सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. अजित तांबे, तसेच श्री. विनोद गावकर, श्री. मिलिंद गावकर, श्री. अमेय सावंत, श्री. सुंदर जाधव, श्री. प्रसाद सावंत, श्री. संजय गावकर, श्री. विश्वनाथ सावंत, कु. स्वप्नील वर्दम यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.








