सावंतवाडीकरांसाठी दिलासा; आता शहरातील कचरा ‘हॉटस्पॉट’वर राहणार सीसीटीव्हीची नजर

​सावंतवाडी

कचरा ‘हॉटस्पॉट’

सीसीटीव्हीची नजर

​सावंतवाडी | राजू तावडे

​        सावंतवाडी शहरातील सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आता थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. शहरातील कचरा समस्येला आळा घालण्यासाठी आणि कचरा टाकणाऱ्यांवर पुराव्यानिशी कारवाई करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या मागणीनंतर शहरातील तीन प्रमुख ‘हॉटस्पॉट’वर सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत.

        सावंतवाडी नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी शहरातील कचरा समस्येचा मुद्दा प्रभावीपणे मांडला होता. उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत, ज्या ठिकाणी नागरिक किंवा व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर कचरा टाकतात, अशा ठिकाणांवर सीसीटीव्हीची देखरेख असावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही केली आहे.

​कुठे बसवले कॅमेरे?

शहरातील ज्या ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, अशा तीन महत्त्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत:

  • ​चेतन नेवगी यांच्या घराशेजारील पाणंद
  • ​कोठावळे पाणंद
  • ​सबनिसवाडा (सार्वजनिक शौचालय परिसर)

​स्वच्छतेला मिळणार बळकटी

या उपक्रमामुळे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करणे प्रशासनाला सोपे होणार आहे. “सीसीटीव्हीमुळे कचरा टाकणाऱ्यांवर वचक बसेल आणि शहरात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण निश्चितच कमी होईल. यामुळे सावंतवाडी शहराच्या स्वच्छतेच्या मोहिमेला नक्कीच मोठी मदत होईल,” असा विश्वास नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केला आहे.

​या मागणीची त्वरित दखल घेतल्याबद्दल नगरसेवक श्री. सूर्याजी यांनी तत्कालीन प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नगरपरिषद प्रशासन आणि आरोग्य विभागाचे विशेष आभार मानले आहेत

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!