सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

​ ॲड. अनिल निरवडेकर  वाढदिवस 

भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

​सावंतवाडी | राजू तावडे

​         सावंतवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस आज सोमवारी स्थानिक भाजप जनसंपर्क कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

          ​वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपचे युवानेते विशाल परब यांच्या हस्ते केक कापून जल्लोष करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ॲड. निरवडेकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

​या कार्यक्रमाला भाजपचे अनेक ज्येष्ठ आणि तरुण पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भाजप युवानेते विशाल परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, नितीन राऊळ, मायकल डिसोजा, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबूरे, माजी नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, विलास जाधव आणि पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

​याशिवाय आंबोली मंडल युवा मोर्चाचे सरचिटणीस स्वप्नील राऊळ, उपाध्यक्ष सुहास राऊळ, संदेश बिडये, विकास परब, मकरंद तोरसकर, साहिल कल्याणकर, भाजप सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, बंटी जामदार, गोविंद साटेलकर, सुमित वाडकर, सेबेस्तीन फर्नांडीस, गोपाळ नाईक, पुंडलीक कदम, साई परब, गुरू पेडणेकर, महेश डोंगरे आणि सुधीर मळीक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे नियोजन आणि उपस्थितांचे आभार मानून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!