देवगड तालुका ‘केमिस्ट’ अध्यक्षपदी मिलिंद मोर्ये यांची निवड

देवगड तालुका

‘केमिस्ट’ अध्यक्ष

मिलिंद मोर्ये 

नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

तालुका सचिवपदी अभय कुळकर्णी, तर जिल्हा सदस्यपदी प्रवीण जोग, योगेश गुरव यांची निवड

देवगड / प्रतिनिधी

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या देवगड तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी मिलिंद मोर्ये यांची, तर सचिवपदी अभय कुळकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येथील राधाकृष्ण रिट्रीट येथे असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन तालुका कार्यकारिणीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ औषध व्यावसायिक किशोर कुळकर्णी हे उपस्थित होते. निरीक्षक तथा जिल्हा संघटनेचे सचिव संजय सावंत (वैभववाडी) यांच्या प्रमुख उपस्थितीत सन २०२६ ते २०२९ पर्यंतच्या कालावधीसाठी तालुका नूतन कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी सदस्य निवड करण्यात आली. नूतन तालुका कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी मिलिंद मोर्ये, उपाध्यक्षपदी देवेंद्र जेठे, सचिवपदी अभय कुळकर्णी, खजिनदारपदी राहुल शिरसाट, सहसचिवपदी विजय पडवळ, संघटन सचिवपदी सनीत आचरेकर यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी प्रवीण जोग व योगेश गुरव यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद मोर्ये यांनी संघटनेच्या सदस्यांचे आभार मानत औषध व्यावसायिकांच्या समस्या सोडविणे, औषध वितरण व्यवस्था अधिक सक्षम करणे, नव्या पिढीतील फार्मासिस्ट व केमिस्ट यांना संघटनेशी जोडणे आणि संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. सभेनंतर नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचा किशोर कुळकर्णी व संजय सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सभेला तालुक्यातील २५ सदस्य उपस्थित होते. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम यांनी तालुका कार्यकारिणीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!