उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप…
कणकवली: –
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका मनसेच्या वतीने समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे आणि बिस्किटांचे वाटप करून त्यांना आरोग्यदायी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी मनसेचे तालुकाध्यक्ष अतुल दळवी, शांताराम साधे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे, तालुकाध्यक्ष समीर तेली यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनसेवेला प्राधान्य देणाऱ्या अमित ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श समोर ठेवून, कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. मनसेच्या या उपक्रमाचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून कौतुक करण्यात आले.








