अबू आझमी यांचा औरंगजेबप्रेमी जिहादी विचारधारा असलेला महाराष्ट्रद्रोही बेताल बडबडपणा – शिवसेना अशांना ठेचून काढल्याशिवाय शांत बसणार नाही!

कणकवली प्रतिनिधी

औरंगजेबप्रेमी जिहादी विचारधारा असलेला महाराष्ट्रद्रोही बेताल अबू आझमी यांचा बडबडपणा – शिवसेना ठेचून काढल्याशिवाय शांत बसणार नाही

– – – संजय आग्रे – शिवसेना उपनेते

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब निर्दोष होता, क्रूर नव्हता,उत्तम शासक होता असे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या महान बलिदानाचा अपमान केला आहे. अशा विकृत विचारसरणीच्या लोकांनी महाराष्ट्राच्या मातीत राहण्याचा अधिकार नाही!

औरंगजेब कोण होता, हे आम्ही विसरलो नाही. तो एक धर्मांध, जिहादी, क्रूर अत्याचारी होता. त्याने लाखो हिंदूंना जबरदस्तीने धर्मांतर करायला लावले, मंदिरे उद्ध्वस्त केली, गुरू तेग बहादूर यांना शिरच्छेद केला आणि संभाजी महाराजांना अमानुष छळ करून ठार मारले. आज या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमींची ही वक्तव्ये म्हणजे हिंदुत्वाचा अपमान आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे!

शिवसेना आणि महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त अशा औरंगजेबप्रेमी विचारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या ठामपणे अबू आझमींना फटकारले, ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे खरे रक्षण आहे. मात्र केवळ शब्दांनी नाही, तर सरकारने तातडीने अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी!

हिंदूंच्या अस्मितेवर वार करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या भूमीत राहून औरंगजेबचा गौरव करणाऱ्यांना महाराष्ट्रात एक इंचही जागा राहणार नाही! शिवसेना अशा राष्ट्रविरोधी प्रवृत्तीना चोख प्रत्युत्तर देईल. असे संजय वसंत आग्रे
उपनेते, शिवसेना (महाराष्ट्र राज्य) म्हणाले तसेच गरज पडल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरून अशा विकृत विचारसरणीला सडेतोड उत्तर देतील!

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!