झारापमध्ये ,”आजरा समितीकडून”,स्वच्छता आणि हरित कामांची पाहणी

झारापच्या स्वच्छता आणि हरित कामांची

आजरा समितीकडून पाहणी

कुडाळ प्रतिनिधी,

“हरित आणि स्वच्छ” (Clean and Green) संकल्पनेअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांची क्षेत्रीय (Spot) पडताळणी करण्यासाठी आजरा पंचायत समितीची विशेष समिती आज झाराप ग्रामपंचायत येथे दाखल झाली. गावातील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन, हरित उपक्रम तसेच ग्रामपंचायतीने प्रस्तावात नमूद केलेल्या विविध बाबींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन सखोल पाहणी करण्यात आली.
आजरा पंचायत समितीचे पी. व्ही. चव्हाण आणि एम. व्ही. तिवले यांनी गावातील विविध ठिकाणी भेट देत प्रस्तावातील कामांची अचूकता तपासली. स्वच्छता मोहिमा, सार्वजनिक परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली

यावेळी झाराप ग्रामपंचायतीच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती समितीसमोर सविस्तर मांडली. ग्रामसेवक गंगाराम वेंगुर्लेकर यांनी प्रस्तावातील तांत्रिक व प्रशासकीय बाबी स्पष्ट करत आवश्यक कागदपत्रे समितीसमोर सादर केली. ग्रामपंचायत कर्मचारी नरेंद्र बिडये, प्रसाद गोडे तसेच डाटा इंट्री ऑपरेटर अमेय तेंडोलकर यांनी पाहणीदरम्यान सहकार्य केले.
या पाहणीदरम्यान अंगणवाडी सेविका संगीता काळेकर, आशा सेविका सारिका वारंग पेडणेकर, तसेच आशा सेविका आशा पेडणेकर यांचा सहभाग होता. तसेच ग्रामसेवक तायंडे आणि अंकिता गावकर यांनीही उपस्थित राहून पाहणी प्रक्रियेत सहकार्य केले.
यावेळी हर्षदा मेस्त्री यांनी गावातील विकासकामे, स्वच्छता मोहिमा, हरित उपक्रम आणि विविध योजनांचे आकर्षक व प्रभावी PPT सादरीकरण करून समितीचे लक्ष वेधून घेतले. गावाच्या विकासाचा प्रवास सुस्पष्ट पद्धतीने मांडल्यामुळे समितीकडून सादरीकरणाचे विशेष कौतुक करण्यात आले.
झाराप ग्रामपंचायतीने गेल्या काही काळात स्वच्छता आणि हरितीकरणावर विशेष भर दिला असून गावात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यामुळे “हरित आणि स्वच्छ झाराप” या उपक्रमाची परिसरात चर्चा सुरू असून आजरा पंचायत समितीच्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे ग्रामपंचायतीच्या कामाची पुन्हा एकदा दखल घेतली गेल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत होती.
  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!