ग्रामसभेकडे पाठ फिरवणाऱ्या सदस्यांविरोधात झाराप आक्रमक!

ग्रामसभेकडे पाठ फिरवणाऱ्या सदस्यांविरोधात झाराप आक्रमक!

कुडाळ प्रतिनिधी, :

झाराप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत आज संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. ग्रामसभेसारख्या महत्त्वाच्या बैठकीला एकही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देत संबंधित सदस्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. “गावाच्या प्रश्नांपेक्षा सदस्यांना राजकारण महत्त्वाचे वाटते का?” असा संतप्त सवालही ग्रामसभेत उपस्थित करण्यात आला.
सरपंच दक्षता मेस्त्री यांच्याविरोधात यापूर्वी अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्यानंतर मेस्त्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणी होऊन त्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज तहकूब ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामसभेला सरपंच दक्षता मेस्त्री, उपसरपंच मंगेश गावकर, ग्रामसेवक गंगाराम वेंगुर्लेकर, तलाठी सुषमा गायकवाड, आशा व अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र सभेच्या सुरुवातीलाच एकही सदस्य उपस्थित नसल्याचे स्पष्ट होताच वातावरण तापले. सदस्य गैरहजर राहण्याबाबत ग्रामपंचायतीकडे कोणताही अर्ज अथवा पूर्वसूचना प्राप्त नसल्याची माहिती ग्रामसेवकांनी सभेत दिली. यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत संबंधित सदस्यांची सखोल चौकशी करून त्यांचे मानधन रोखण्यात यावे, असा ठराव मंजूर केला.
“ग्रामसभेला पाठ फिरवणाऱ्या सदस्यांनी गावाच्या लोकशाही प्रक्रियेचाच अपमान केला आहे,” अशा तीव्र प्रतिक्रिया सभेत उमटल्या. ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सदस्यांविरोधात प्रशासनाने तातडीने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत सभेत माहिती देण्यात आली. ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांवर भर देणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. ही केवळ आरोग्य तपासणी मोहीम नसून व्यापक लोकचळवळ असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
तसेच “विकसित भारत – गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन” संदर्भातील कोणत्याही सूचना गावात उपलब्ध नसल्याची माहिती सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद शाळेचे छप्पर गळत असल्याने पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, असा ठरावही मंजूर करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी गावात नियमित उपस्थित राहत नसल्याने त्यांच्या नियमित भेटीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचेही सभेत ठरले.

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!