झारापच्या प्रगतीला ब्रेक लावणारे चेहरे उघड होणार?

झारापच्या प्रगतीला ब्रेक 

कुडाळ प्रतिनिधी :ता. 1

झाराप ग्रामपंचायतीत सध्या एक भन्नाट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या अंमलबजावणीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोंडोमिसे यांनी स्थगिती दिल्यानंतर सरपंच पुन्हा कारभारावर आल्या. मात्र खातेबदलाचा विषय आला की ग्रामपंचायतीतील काहींच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे झाल्याची चर्चा गावभर रंगली आहे.
गावकऱ्यांच्या भाषेत सांगायचे तर, “सरपंचांना गाडी दिली खरी, पण चावी मात्र अजूनही कुणाच्या तरी खिशातच आहे!” त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार सध्या पहिल्या गिअरमध्येच अडकून पडल्याची मिश्किल चर्चा सुरू आहे.
एक ग्रामस्थ तर म्हणाले, “सरपंच कार्यालयात आल्या, खुर्चीत बसल्या, फाईल उघडली… पण खातेबदलाचा विषय निघताच कुणीतरी ‘नेटवर्क एरर’ दाखवतो!”
गावातील चहाच्या टपरीवर तर या विषयावर नवेच संशोधन सुरू आहे. काहींचे म्हणणे आहे की, “झारापच्या विकासाची गाडी धावत सुटेल या भीतीने काही जण ब्रेकवर पाय ठेवून बसले आहेत.”
तर दुसऱ्या एका नागरिकाने टोला लगावत म्हटले, “हे खातेबदलाचे प्रकरण म्हणजे लग्न झाल्यानंतर वराला घरात प्रवेश आहे, पण कपाटाची चावी नाही; अशी अवस्था झाली आहे!”
दरम्यान, गावात एक नवा प्रश्न चर्चेत आला आहे — “खातेबदलाला एवढा विरोध आहे, म्हणजे त्या खात्यात खजिना आहे की गावाचा विकास?”
झारापकर मात्र या सगळ्या घडामोडीकडे मजेशीर नजरेने पाहत आहेत. कारण गावात आता अशी चर्चा सुरू आहे की,
“विकासाची गाडी तयार आहे, चालकही तयार आहे… फक्त ब्रेकवर बसलेले प्रवासी खाली उतरायचे बाकी आहेत!”
आणि म्हणूनच गावकऱ्यांचा सवाल — झारापच्या प्रगतीला ब्रेक लावणारे चेहरे अखेर उघड होणार का?

  • संबंधित पोस्ट

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे माजी सभापती, शिवसेना नेते एस.टी.सावंत    निधन; राजकीय-सामाजिक क्षेत्र शोककळा ​कणकवली / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार…

    पुढे वाचा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ​३२६ वर्षांची परंपरा  ‘खवळे महागणपती’ कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर ​कणकवली (दि. ३ ऑक्टोबर): देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील तब्बल ३२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्रसिद्ध खवळे महागणपतीचा गणेशोत्सव सध्या मोठ्या भक्तिभावात…

    पुढे वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    हे विसरू नका

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती, शिवसेना नेते  (एस.टी. ) शशिकांत तुकाराम सावंत  यांचे निधन; राजकीय-सामाजिक वर्तुळात शोककळा

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

    ३२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या तारामुंबरीच्या ‘खवळे महागणपती’चे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!
    पालकमंत्री ना. नितेश राणे शनिवारी ३ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
    वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता समाज परिवर्तनाचा आधार: ज्येष्ठ विचारवंत डी. आर. ओहोळ

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी उधळला ‘लव्ह जिहाद’चा डाव; अल्पवयीन हिंदू मुलीला फसवून विवाहाचा होता प्रयत्न!

    नाटळ मतदारसंघातील दुष्काळ परिस्थितीचा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी घेतला आढावा ​संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य नियोजन करण्याचे निर्देश

    error: Content is protected !!