वैश्यवाणी समाज
ओबीसी लाभ….
आमदार प्रमोद जठाराणा यश
वैभववाडी:
वैश्यवाणी समाजाच्या हक्काच्या ओबीसी लाभाचा मार्ग मोकळा झाला असून, शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे समाजातील विद्यार्थी, युवक आणि पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार ‘हिंदू-वाणी’, ‘हिंदू-वैश्य’ आणि ‘हिंदू-वैश्यवाणी’ या तीनही जाती ‘वैश्यवाणी’ या जातीत समाविष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, उपलब्ध जुन्या दस्तावेजांमध्ये संबंधित नोंदी आढळल्यास पात्र व्यक्तींना वैश्यवाणी जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे वैश्यवाणी समाजातील पात्र लाभार्थ्यांना शिक्षण, रोजगार आणि शासनाच्या विविध ओबीसी सवलती व योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे. या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे अभिनंदन करताना वैश्यवाणी ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष सुनील खाडये यांनी आमदार प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्याचे विशेष कौतुक केले आहे. वैश्यवाणी समाजाच्या हक्काचे ओबीसी लाभ मिळवून देण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.








